शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा, प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:07 IST

यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमुंबईत फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन मागणीचे निवेदन दिलेदेशातील एकूण यंत्रमाग उद्योगांपैकी राज्यात ५० टक्के उद्योग बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर या कामगारांसाठीही कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ४  : यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.शिंदे यांनी बुधवारी मुंबईत फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात नागेश बोमड्याल, रमेश पाटील, शिवराया कबलगी, रविकुमार मिरगले, पाटील, तिरूपती परकीपंडला आदी उपस्थित होते.निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने २ फेब्रुवारी २०१२ मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकूल योजना, कामगार कल्याणकारी योजना, आरोग्य विमा योजना आदी लागू करण्याचा निर्णय घेतला. १५ आॅक्टोबर २०१३ मध्ये वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. तो शासनास सादरही झाला.देशातील एकूण यंत्रमाग उद्योगांपैकी राज्यात ५० टक्के उद्योग असून तो सोलापूरसह भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, विटा, सांगली या ठिकाणी आहे. या क्षेत्रात काम करणाºया कामगारांची संख्या २५ ते ३० लाखांपर्यंत आहे. त्यामध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे. बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर या कामगारांसाठीही कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी कायदा केला पाहिजे. त्यांचे वेतन निर्धारण करून त्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी कल्याणकारी मंडळ शासनाने तातडीने स्थापन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.---------------------------मुख्यमंत्री सकारात्मकयंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून त्यांनी लवकरात लवकर हे मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.