शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्खं पवार कुटुंब प्रचार करत फिरतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागस्ट, येड्राव, जित्ती, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, हुलजंती येथील आयोजित ...

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागस्ट, येड्राव, जित्ती, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, हुलजंती येथील आयोजित सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, मरवडेचे सरपंच नितीन घुले, माजी सरपंच रजाक मुजावर, बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, आजपर्यंत पवार कुटुंबीयांनी राज्यातील अनेक साखर कारखाने हडप केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा डोळा आता विठ्ठल साखर कारखान्यावर असल्याने त्यांचे सर्व कुटुंबीय आज प्रचारासाठी मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघात येत आहेत.

बळीराजाकडे यांनी दुर्लक्ष केले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी उद‌्ध्वस्त झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी आम्ही आज गेलो होतो. प्रचारासाठी आलेल्या एकाही मंत्र्याने पाहणी करण्यासाठी जाण्याची तयारी दर्शवली नाही.

---

यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

ठाकरे सरकारमधील मंत्री फक्त निवडणूक आली की मते मागण्यासाठी येत आहेत. महावसुली सरकार हे कोरोनाच्या नावावर नागरिकांना कामापासून वंचित ठेवत आहे. लॉकडाऊन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कामगारांच्या खात्यावर ५ हजार रुपये देण्याची मागणी आम्ही केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. अशा ठाकरे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा आ. प्रवीण दरेकर यांनी केला.

सध्याचे सरकार बिल्डरांना सवलती देण्यात मग्न : पडळकर

सरकारमधील मंत्री नुसते पोकळ आश्वासन देऊन जातात. मराठा समाजाच्या जीवावर आजपर्यंत यांनी राजकारण केले, पण त्यांनी आरक्षण दिले नाही. भाजप सरकारने दिलेले आरक्षणसुद्धा या ठाकरे सरकारने काढून घेतले. हा अन्याय मराठा समाजावर झाला आहे. राष्ट्रवादी म्हणजे भूलभुलैय्या पार्टी असून त्यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकरी देशोधडीला लागला असताना हे सरकार बिल्डर यांना सवलत देण्यात मग्न असल्याचे आ. गोपीचंद पडळकर म्हणाले.