शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार

By admin | Updated: January 24, 2017 19:33 IST

सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार

सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणारकाशिनाथ वाघमारे - सोलापूरमहानगरपालिकेच्या निवडणुकीत इतर पक्षांच्या स्पर्धेत आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी मनसेच्या इंजिनने धावण्याची तयारी चालवली आहे़ सर्वच प्रभाग लढवण्याची तयारी ठेवली असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत ९७ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ तसेच सोलापूरचे संपर्कप्रमुख म्हणून बाबाराजे जाधवराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यापूर्वीही मनसेने महापालिकेच्या जागा लढविल्या आहेत़ परंतु गटतट आणि तुल्यबळाच्या अभावामुळे महापालिकेत खाते खोलू शकले नव्हते़ खाते खोलण्याची आता पुन्हा संधी आल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे़ तीन महिन्यांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात शिवाजी चौकात कार्यालय खोलण्यात आले आहे़ संघटन अभाव, आहे त्या पदाधिकाऱ्यांमध्ये गटातटाचे राजकारण, पक्षाच्या कार्यक्रमांचा अभाव, प्रदेश कार्यकारिणीतील संपर्क नेत्यांची सोलापूरकडे पाठ, अशा अनेक कारणांवरुन सोलापूरमध्ये पक्षाच्या अस्तित्वाला वावच मिळू शकले नाही़ चार महिन्यांपूर्वी पक्षाच्या श्रेष्ठींनी सोलापूरकडे लक्ष वेधले आणि चार-पाच वेळा बैठका घेऊन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्रित येऊन कामाला लागण्याबाबत कान टोचले़ नवे संपर्क अध्यक्ष बाबाराजे जाधवराव हे मंगळवारी सोलापुरात दाखल झाले़ पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती नोंदविण्यात आल्या़ जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहर अध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, शहर संघटक उमेश रसाळकर यांनी मुलाखती घेतल्या़ ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करीत इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले़-----------------------९७ पैकी ६० इच्छुक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते४मुलाखती दिलेल्या ९७ इच्छुकांपैकी ६० इच्छुक हे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत़ पक्षनिष्ठेचे फळ देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होणार आहे़ रवी शिंदे (प्रभाग ११), श्रीधर गुडेली (प्रभाग ९), अनिल भिसे (प्रभाग २२), रुक्मिणी जाधव (प्रभाग २२), भारती मन्सावाले (प्रभाग १४), अर्चना इंगळे (प्रभाग २), कय्युम सिद्दीकी (प्रभाग १९), नितीन व्हसकेरी (प्रभाग २०), गोविंद बंदपट्टे (प्रभाग १३) पक्षासाठी धडपडणाऱ्या या प्रमुख उमेदवारांसह आज ९७ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़