शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अतिक्रमणाची धडक मोहीम बोअर चालकांना तंबी :

By admin | Updated: May 11, 2014 00:57 IST

दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ भागात कारवाई

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ येथील अतिक्रमण काढण्यात आले. दत्तनगर येथील खासगी बोअर चालकांना तंबी देऊन पाणी विकण्यास मनाई करण्यात आली. तसेच या ठिकाणी रस्त्यावर थांबणार्‍या पाणी वाहतुकीच्या टँकरना ताकीद करण्यात आली. गेल्या आठवड्यात पाच्छापेठ येथे पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत शाळकरी मुलगा ठार झाला होता. याची दखल घेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी सकाळी या परिसराची पहाणी केली. आंध्र दत्त चौकात खासगी पाणी विक्री करणार्‍या ठिकाणाला भेटी देऊन आयुक्तांनी संबंधितांना ताकीद दिली. तसेच या ठिकाणी थांबणार्‍या पाण्याच्या टँकरना कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पहाणी केली असता या भागात अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यांनी तत्काळ अतिक्रमण विभागाला आदेश देऊन ते काढण्यास सांगितले. त्यानुसार अतिक्रमण विभागाने ११ वाजता अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. या कारवाई दरम्यान खासगी बोअरमधून पाण्याची विक्री करणार्‍या मालकांचे रस्त्यावरील अतिक्रमण काढले. त्यानंतर दत्तनगर परिसरात समोर आलेले अतिक्रमणही पाडण्यात आले. गवईपेठ येथे महापालिकेच्या रस्त्यावर खासगी बोअर मालकाने पाणी विक्रीसाठी बांधलेले हौद जमीनदोस्त करण्यात आले. तसेच रविवारपेठ व पाच्छापेठ येथील समोरच्या बाजूला करण्यात आलेले अतिक्रमण पाडण्यात आले. अतिक्रमण विभागाच्या या कारवाई प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.डी. जाधव, बाळासाहेब भोसले, एन.एन. बाबर, प्रभाकर काडगी आदी कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------

अन् कॅन्टीनचे अतिक्रमण काढले... आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सकाळी ६.३0 वा. दत्तनगर येथील अतिक्रमणाची पहाणी केली. दरम्यान त्यांनी याच ठिकाणी असलेले सरगम टी अ‍ॅन्ड कोल्ड्रिंक्स वर जाऊन चहा घेतला होता. मात्र दुपारी त्याच कॅन्टीनचे अतिक्रमण काढण्यात आल्याने सर्वत्र एकच चर्चा होती.

------------------------------------------------------

आयुक्तांच्या आदेशावरून या परिसरातील १0 ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरील अतिक्रमण काढले असून ही कारवाई चालूच राहणार आहे. नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घ्यावे. - आर.डी. जाधव, उपअभियंता, महानगरपालिका,