शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीची निवडणूक लढण्यापूर्वीच आठजण बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३८ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ...

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३८ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. यामध्ये पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगीरथ भारत भालके (राष्ट्रवादी), समाधान महादेव आवताडे (भाजपा), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र काशिनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, नागेश आण्णासो भोसले, इलियास हाजी युसूफ शेख, रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय चरणू पाटील, अशोक ज्ञानदेव वाघमोडे,अभिजित वामनराव आवाडे-बिचकुले, अमोल अभिमन्यू माने, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, मोहन नागनाथ हळणवर, रामचंद्र नागनाथ सलगर, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे,मनोज गोविंदराव पुजारी, बापू दादा मेटकरी, बिरुदेव सुखदेव पापरे यांचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली. अर्ज छाननी प्रक्रियेवेळी निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे उपस्थित होते .

या कारणासाठी यांचे अर्ज अवैध

उमेदवारी अर्जांची छाननीत शीतल शिवाजी आसबे, सिध्दाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. बळीराम जालिंदर बनसोडे, किशोर सीताराम जाधव, सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरवला गेला. मतदार संघाबाहेरील सूचक असल्याने सतीश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरवला. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे.