शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कर्नाटक राज्यात दहावी-बारावीची परीक्षा होणार एकत्रित : शिक्षणमंत्री तन्वीर सेठ 

By appasaheb.dilip.patil | Updated: July 25, 2017 20:46 IST

विजयपूर दि २५ :  कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देएकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारसमोर मांडण्यात आलाप्रश्नपत्रिका आॅनलाईन पुरविणारशिक्षण खात्यासमोर आव्हानएकाच परीक्षागृहात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा

आॅनलाइन लोकमत सोलापूरविजयपूर दि २५ :  कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षण खाते आणि पदवीपूर्व महामंडळाच्यावतीने यावर निर्णय घेतला जाणार आहे. शिक्षणमंत्र्यांनीही याला हिरवा कंदील दाखविला आहे.मार्च व एप्रिल २०१८ मध्ये होऊ घातलेल्या या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या संदभार्तील अंतिम निर्णय आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवडयात घेतला जाणार आहे. एकाच परीक्षागृहात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. एका बेंचवर दहावीचा तर त्या मागील बेंचवर बारावीचा विद्यार्थी बसवून परीक्षा घेण्याचा उद्देश आखण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री तन्वीर सेठ यांनी दिली. सध्याच्या कल्पनेनुसार दोन्ही परीक्षांची वेळापत्रके बनवितानाच योग्य ती काळजी घेऊन एकाच तारखेला दोन्ही परीक्षा सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, यासाठीची व्यवस्था करताना खात्याची डोकेदुखी वाढणार आहे. यंदा दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण कर्नाटक राज्यभरात ८ लाख इतकी आहे. तर बारावीच्या वगार्तील   कर्नाटक राज्यभरातील विद्यार्थी सहा लाख आहेत. एकाच वेळी 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना योग्य व्यवस्था असणाºया परीक्षा केंदांची स्थापना करणे गरजेचे बनणार आहे.कर्नाटक राज्यभरात सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळांची संख्या 16 हजार आहे. तर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांची संख्या 5 हजार आहे. या सर्व ठिकाणी परीक्षा केंदे स्थापन करण्याची सोय मात्र नाही. शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची दुरवस्था पाहता परीक्षा केंदे स्थापन करण्यासाठी शिक्षण खात्याला खासगी शाळा व महाविद्यालयांचाच आसरा घ्यावा लागतो. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना विचारले असता सध्या याबाबत सखोल चर्चा सुरू आहे. त्यावर नक्कीच मार्ग काढला जाईल. परीक्षा पद्धतीत बदल करण्याची ही दुसरी वेळ असून त्यावर नक्कीच मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.----------------------शिक्षण खात्यासमोर आव्हानया दोन्ही परीक्षांसाठी लागणारा वेळ वाचविणे आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांवर आळा घालणे हा प्रमुख उद्देश आहे. कोणत्याही गैरप्रकारांशिवाय परीक्षा घेणे हे आता शिक्षण खात्यासमोर आव्हान बनले आहे. पेपर फुटी, कॉपी आणि सामुदायिक कॉपी हे प्रकारच आव्हानात्मक ठरले आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यास ही आव्हाने ९० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी लागणाºयाकर्मचाºयांची संख्या कमी होईल. तसेच वाहतुकीचा खर्चही वाचेल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

----------------------प्रश्नपत्रिका आॅनलाईन पुरविणारपेपरफुटीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी दहावी आणि बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने पुरविण्याबाबत आतापासून जोर दिला जात आहे. प्रत्येक जि'ातील केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवून त्या इतर केंद्रांवर पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या यासाठी लागणा?या कालावधीचा अभ्यास सुरू आहे. ही योजना जाहीर करण्यापूर्वी योग्य ती प्रात्यक्षिके घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.