शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच्या काळात राजकारणाचे झाले गुन्हेगारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. या नंतर झालेल्या कार्यकर्त्यांचा मेळाव्या प्रसंगी चंद्रकांत ...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. या नंतर झालेल्या कार्यकर्त्यांचा मेळाव्या प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, राम शिंदे, श्रीकांत भारती, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, संभाजी निलंगेकर आदी आमदार, नगराध्यक्षा साधना भोसले, उपसभापती राजश्री भोसले, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील यांनी, हे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांना फसवत असल्याचा आरोप केला. अतिवृष्टी मदत, कोरोना काळातील अपयश, वीज तोडणी व आता वाझे प्रकरण या सर्वांचा परिणाम म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेच्या या सरकारच्या विरोधात कौल दिला. साडे सहा हजार ठिकाणी भाजपाचे सरपंच नियुक्त झाले. यामुळे जाणता राजा घाबरला आणि त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तातडीने पुढील निवडणुका न घेण्याची सूचना केली. यामुळे ५ महानगरपालिका, ९२ नगर परिषदा तसेच शेकडो सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

त्यानंतर समाधान आवताडे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून त्यांच्यामुळे संपूर्ण देशात राज्याची बदनामी झाली आहे. लवकरच हे सरकार खाली उतरणार असून भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मागील तीनवेळा जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने प्रश्‍न सोडविले नाहीत. मतदानामधून ही नाराजी बाहेर पडणार असून परिचारक यांच्या मदतीने दोन तारखेला गुलाल घेऊनच मुंबईत जाणार असल्याचा विश्‍वास समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. खा. जयसिध्देश्‍वर स्वामी यांनी, राज्याच्या सत्ता परिवर्तनाचे बिगुल पंढरीतून वाजले असल्याचे सूचक वक्तव्य केले. पंढरीतून परिवर्तन होणार असून ते राज्यामध्ये देखील लवकरच होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

राम व लक्ष्मणाची जोडी ::::::

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक या बंधूचा उल्लेख राम लक्ष्मणाची जोडी असा केला. आजच्या जगात एखाद्या व्यक्तीकडे दोन रूमाल असतील तर तो एक रूमाल देणार नाही. परंतु या परिचारक बंधूनी मनाचा मोठेपणा दाखवत समाधान आवताडे यांच्यासाठी माघार घेतली. दोघांपैकी एकानेच निवडणुकीच्या रिंगणात उभे रहावे असा विचार पक्षाने मांडल्या नंतर यावर प्रशांत परिचारक यांची दावेदारी होती. मात्र त्यांनी मोठे मन करून आवताडे यांना संधी दिली. यामुळे भाजपा परिचारक यांचा आभारी आहे या शब्दात कौतुक केले.

फोटो :::::::::::::::

पंढरपूर येथे कार्यकर्ता मेळाव्यानिमत्त एकत्र आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राम शिंदे, बाळाभाऊ भेगडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रशांत परिचारक, श्रीकांत देशमुख,