शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पावसामुळे कळंबोलीत बत्ती गुल

By admin | Updated: June 14, 2017 03:15 IST

इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबोली : इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात कळंबोलीतील महावितरणची यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीज गायब झाली, तर मंगळवारी सकाळी तीन तास बत्ती गुल होती. त्यामुळे कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सिडको वसाहतीत दिवसागणिक लोकवस्ती वाढत चालली आहे. त्याच प्रमाण वीजजोडण्यांची संख्या वाढत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या विचार करता अनेक सुधारणा अपेक्षित असताना त्या केवळ कागदावरच आहेत. त्याचबरोबर एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तरी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. सिडको वसाहतीत वीजगळती व थकबाकीचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. बत्ती गुल होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा याकरिता महावितरणने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी उन्हाळ्यात पनवेल परिसरात दिवसभर शटडाऊन घेतला जात होता. मंगळवार तर महावितरणचा दुरूस्तीचा हक्काचा वार त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली ग्राहकांना घामाघूम केले जात होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नसल्याची प्रचिती सोमवारी कळंबोलीतील वीजग्राहकांना आली. या नोडमध्ये रात्री नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो मध्यरात्री सुरळीत झाला. मंगळवारीही सकाळी साडेसहा वाजता गुल झालेली बत्ती दहा वाजता पूर्ववत झाली. यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यासंदर्भात सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. व्ही. पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. विजेच्या प्रश्नावर सेना आक्र मकग्राहकांकडून नियमित वीज बिल भरण्याची अपेक्षा केली जाते. त्याचप्रमाणे सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा मिळणे त्यांचा हक्क आहे. त्यानुसार योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे, अन्यथा ग्राहकहितवर्धक भूमिका घेवून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याची येईल असा इशारा मंगळवारी निकम यांनी दिला. या संदर्भात पक्षाच्या वतीने कळंबोली उपविभागीय कार्यालयात पत्र देण्यात आले.