गोदाम उपलब्ध होत नसल्याने मनपा निकालास एक तास उशीर होणारसोलापूर : महापालिका निवडणूक निकालास नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीर लागणार आहे. मतमोजणीचे ठिकाण असलेल्या रामवाडी गोदामात धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन गोदाम उपलब्ध न झाल्याने हा बदल करण्यात आला आहे. महापालिका निवडणूक तयारीबाबत जिल्हाधिकारी रणजीत कुमार व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांची शुक्रवारी बैठक झाली. मनपा मतमोजणीसाठी रामवाडी गोदामाची महसूल खात्याकडे मागणी करण्यात आहे. या गोदामात धान्य असल्याने १ फेब्रुवारी रोजी ताबा मिळेल, असे कळविण्यात आले आहे. त्याबाबत आज आढावा घेण्यात आला. गोदामात धान्याचा साठा मुबलक असल्याने दोन गोदाम पूर्णपणे रिकामे करणे शक्य नाही. त्यामुळे नियोजित मतमोजणी कार्यक्रमात बदल करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. पूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार मतमोजणीसाठी २0 टेबल ठेवण्यात येणार होते. तीन फेऱ्यांत व तीन तासांत मतमोजणी पूर्ण होईल असा अंदाज होता. पण आता दोन गोदाम न मिळाल्याने १५ टेबल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच टेबल कमी झाल्याने चार फेऱ्या आणि मतमोजणीस एक तास विलंब म्हणजे चार तास लागतील, असे आयुक्त काळम—पाटील यांनी स्पष्ट केले. जर गोदाम उपलब्ध झाले तर पुन्हा हा वेळ कमी होईल. कर्मचाऱ्यांना आजपासून प्र्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. ११६४ कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. शनिवार व रविवारी हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. यात मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मतदान केंद्राचे साहित्य नॉर्थकोट निवडणूक कार्यालयातूनच उपलब्ध केले जाणार आहे. ------------------------------------अर्ज भरल्यावर खर्च लागूउमेदवारी अर्ज दाखल केला की संबंधित उमेदवारास निवडणूक खर्च लागू होणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराने त्यावेळपासून खर्चाचा हिशोब ठेवणे बंधनकारक आहे. उमेदवाराने कशावरून प्रचार सुरू केला यावर वॉच ठेवणारे पथक कार्यरत झाले आहे.
गोदाम उपलब्ध होत नसल्याने मनपा निकालास एक तास उशीर होणार
By admin | Updated: January 28, 2017 12:44 IST