शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST

या नगरपंचायतीवर माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची १० मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजअखेरपर्यंत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे ...

या नगरपंचायतीवर माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची १० मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजअखेरपर्यंत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे फिरकलेच नाहीत.

महाळुंग येथून श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग जात आहे. या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे गेली आहेत. त्या शेतकऱ्यांना नगरपंचायतीकडून येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु दाखल्यासाठी नगरपंचायतीकडून शेतकऱ्यांची बाकी भरून घेतली जात नाही व दाखला दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळणार नाहीत.

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत व त्याची पावतीही द्यायची नाही, असे प्रशासकाने तोंडी आदेश दिल्याने नगरपंचायतीमधील कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे ३४ कामगारांपैकी पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभाग याव्यतिरिक्त इतर सर्व कामगारांना नगरपंचायतीमध्ये बसून राहण्याची वेळ आली आहे. जर महाळुंग-श्रीपूर परिसराला होणारा सार्वजनिक पाणीपुरवठा काही अडचणीमुळे बंद पडल्यास कर्मचाऱ्यांना कोणतेही आदेश नसल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी मोठा त्रास होणार आहे.

महाळुंग-श्रीपूर परिसरात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सर्व यंत्रणा बंद असल्याने त्याबाबत जनजागृतीचे कामही पूर्णपणे बंद पडले आहे.

याबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून नगरपंचायतीचे कामकाज व व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

जन्म अन‌् मृत्यू दाखल्यांची नोंदच नाही

सर्वसामान्य ग्रामस्थांचे महत्त्वाच्या असलेल्या जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांबाबत जन्म अन‌् मृत्यू रजिस्टरला कोणतीही नोंद घेतली जात नाही. एका महिन्यात नगरपंचायतीकडे नाव नोंदणी झाली नाही तर सदर संबंधित ग्रामस्थांना कोर्टामार्फत नोंद करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना जन्म व मृत्यूची नावनोंदणी मोठी जाचक व खर्चिक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही नाव नोंदणी त्वरित सुरू करावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.