शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात बुडून माय लेकींचा मृत्यू, सोलापूरातील घटना

By appasaheb.dilip.patil | Updated: July 25, 2017 19:59 IST

वैराग दि २५  : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देएक अल्पवयीन मुलगी सुदैवाने वाचल्याची माहितीया घटनेची नोंद वैराग पोलीसात मुंबई येथून मानेगांव येथे आठ दिवसांपूर्वी आले होते़

आॅनलाइन लोकमत सोलापूरवैराग दि २५  : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़ या घटनेत  एक अल्पवयीन मुलगी सुदैवाने वाचल्याची माहिती समोर आली आहे़  या घटनेची नोंद वैराग पोलीसात झाली आहे. उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय -२५)  त्यांची मुलगी सुजिता ( वय -१० ) या असे मयत झालेल्या मायलेकीचे नाव आहे़ घटनेची खबर बापू बाजीराव काळे यांनी वैराग पोलिसात दिली आहे .दरम्यान, देवाच्या कार्यक्रमासाठी मूळ माणेगांवचे इबीतवार कुटुंब हे मुंबई येथून मानेगांव येथे आठ दिवसांपूर्वी आले होते़ दरम्यान मंगळवारी दुपारी  गावतळ्यामध्ये धुणे धुण्यासाठी उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय -२५)हिच्यासमवेत त्यांची मुलगी सुजिता ( वय -१० ) आणि नातेवाईकांची मुलगी राणी गोपीनाथ काळे ( वय -१०) या दोघीही तळ्यावर गेल्या. त्यावेळी तोल जावून राणी गोपीनाथ काळे ही पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी उषाबाई दत्तात्रय इबीतवार हिने  पाण्यात उडी घेतली पण तिलाही पोहता येत नसल्याने ती ही बुडू लागली. हा सगळा प्रकार पाहणाºया सुजिताने बुडणाºया आईला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. सुजितालाही पोहता येत नसल्याने तिघीही बुडू लागल्या. हा प्रकार कृष्णा विठ्ठल काळे ( वय -८ ) याने पाहिला या घटनास्थळापासून दूर असणाºया समाधान ताटे, बबलू पाखरे ,शिवा काळे यांना सांगितले. या तिघा युवकांनी लगेच उड्या टाकून तिघींना बाहेर काढले. त्यांना तात्काळ वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच उषाबाई दत्तात्रय इबीतवार आणि त्यांची मुलगी सुजिता दत्तात्रय इबीतवार यांचा दुदेर्वी मृत्यू झाला होता. तर राणी गोपीनाथ काळे हिला योग्य वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वैदयकीय अधिकारी डॉ.जयवंत गुंड यांनी बेशुद्ध असलेल्या राणीचे सीपीआर केले़ त्यामुळे ती ५ मिमिटात शुद्धीवर आली व तिचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची वैराग पोलीसात  नोंद आली आहे.