शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले, शेतीपिकांचे नुकसान

By admin | Updated: March 15, 2017 18:37 IST

सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले, शेतीपिकांचे नुकसान

सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले, शेतीपिकांचे नुकसानसोलापूर : सकाळपासून ढगाळ हवामानामुळे चिंतेत असलेल्या व वाढत्या उन्हाचा चटका सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट सह अन्य तालुक्याला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले़ विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, मंद्रुप, तैरामैल, अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी, चिंचोळी, कुंभारी आदी परिसरात पावसाने चांगला तडाखा दिला़ यावेळी विजेच्या कडकडाट जोरात सुरू होता़ त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते़ या पावसामुळे सुगीचा फेरा थांबला असून अनेक पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे़ उन्हाचा कडाका सुरू झालेल्या सोलापूरला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत होते़ त्यामुळे आज पाऊस पडणार की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ यामुळे द्राक्ष, ज्वारी, गहु, हरभरा आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे़ पावसाच्या सरींमुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त सोलापूरवर मेहरबान झालेल्या पावसाने सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावली. आता उन्हाळ्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चांगला पाऊस पडल्याने परिसरात गारवा निर्माण झाला होता.