शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

चालकास मारहाण करून कंटेनर पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST

टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आशिबी अहमद केवी हा चालक कंटेनरचा केए ४१ ए२४०४ घेऊन अहमदाबाद येथून ...

टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आशिबी अहमद केवी हा चालक कंटेनरचा केए ४१ ए२४०४ घेऊन अहमदाबाद येथून बेंगलोरकडे निघाला होता. शुक्रवार टेंभुर्णी पासून ७-८ किलोमीटर पूर्वेस आला असता त्यास रोडवर पडलेला जॅक दिसला. यामुळे त्याने कंटेनर थांबवून जॅक घेण्यासाठी उतरला असता रोडच्या बाजूस दबा धरून बसलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी अचानक हल्ला केला. दोन्ही चालकाला चाकूचा धाक दाखवत जबर मारहाण केली. नंतर त्यांचे हात-पाय बांधून रोडच्या कडेला साेडले व त्यांच्याकडील रोख रक्कम नऊ हजार रुपये व कंटेनर घेऊन पोबारा केला.

नंतर हे दोघे बराच वेळ तेथेच रस्त्यावर वाहनांना हात करीत होते. पण वाहने थांबली नाहीत. पोलीस गस्त वाहन आल्यावर त्यातून ते पोलीस ठाण्यात आले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याबाबत चालक आशिबी अहमद केवी याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करत आहेत.

कंटेनर सोडले, टायर पळविले

चालकांस मारहाण करून कंटेनर पळवून नेला. पण तो कंटेनर टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अकोले बुद्रूक गावच्या हद्दीत सापडला, पण त्याचे दोन टायर दरोडेखोरांनी चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.