या मोहिमेचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे व नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम, टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार घोळवे, डॉ. संतोष कुलकर्णी,डॉ. आशिष शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डिकोळे यांनी लसीबाबत भीती न बाळगता क्रमाने लसीचा लाभ प्रत्येकांनी घ्यावा. याबाबत इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. गिरीश गव्हाणे। डॉ. प्रसन्न शहा, डॉ. प्रद्युम्न सातव, डॉ. रोहित दास, डॉ. विलास मेहता, डॉ. परम बिनायकीया, डॉ. संतोष दोशी, डॉ. नितीन भोरे आदीसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. दिवसभर या लसीकरणाला शहरातील सर्व डॉक्टरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य सेविका,सेवक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-----०३कुर्डूवाडी-कोविड---
फोटो ओळ- कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात कोविशील्ड लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाडसह मान्यवर.
झझझझ