शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महसूल पथकाची कारवाई

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 30, 2023 18:56 IST

मंडल अधिका-याने दिली फिर्याद

सोलापूर : रात्र गस्तीवरील महसूल पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्यांचा साठा करून अवैधरीत्या वाहनांसाठी वापर करणारे रॅकेट सांगोला तालुक्यात यलमार मंगेवाडी रस्त्यावर उघडकीस आणला. यावेळी पथकाने २६ भरलेल्या व ३८ रिकाम्या गॅस टाक्या, गॅस भरण्यासाठी लागणा-या दोन मोटारी, दोन वजनकाटे, असा १ लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई  यलमार-मंगेवाडी (ता. सांगोला) कच्चा रस्त्यावरील बंद दूध संकलन केंद्राजवळ केली. याबाबत मंडलाधिकारी महेश जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अमोल अशोक पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मंडल अधिकारी महेश जाधव, पोलके, तलाठी गायकवाड, लिगाडे हे २९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास गस्तीवर होते. रात्री ११.३०च्या सुमारास कमलापूर, यलमर-मंगेवाडी हद्दीजवळ आल्यानंतर त्यांच्यासमोर अमोल पाटील यांच्या घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून एक कार त्यांच्या पुढे सांगोल्याच्या दिशेने जात असताना त्यांना गॅसचा वास आला.

त्यांनी संशयीत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु ती न थांबता सांगोलाच्या दिशेने वेगात निघून गेली. त्यांनी परत त्याच कच्च्या रस्त्यावरून  आतमध्ये गेले असता अमोल पाटील यांच्या बंद दूध संकलन केंद्र व गुरांच्या गोठ्यास चौफेर तारेचे कंपाउंडच्या आत पाहणी केली. यावेळी २६ गॅस टाक्यांसह ३८ रिकाम्या टाक्या, १४.५ किलोची रिकामी टाकी, असे सुमारे १ लाख २५ हजार ८०० रुपयांचे साहित्य मिळाले.