शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनो.. पाया पडतो कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, ...

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंंडे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, देशभर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. प्रत्येक नागरिकांनी ऑक्सिजनची स्थिती येईपर्यंत अंगावर आजार काढू नये. त्वरित तपासणी करून विलगीकरणात राहून उपचार घ्यावेत. येत्या दोन दिवसांत आणखी पाच ठिकाणी जिंती, कोर्टी, वरकुटे, जेऊर, शेलार हॉस्पिटल आणि लोकरे हॉस्पिटलमध्ये १०० ऑक्सिजन बेड करण्याचे प्रस्तावित आहे. येथे सर्व वैद्यकीय स्टाफ भरण्यात येणार आहे. शनिवारी १५ हजार लस उपलब्ध झाली आहे. लसीचे योग्य नियोजन करा, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, जि. प. सदस्य सवितादेवी राजेभोसले, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, नगरसेवक अतुल फंड, प्रा. गोवर्धन चौरे यांनी ऑक्सिजन बेड, रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, मुख्याधिकारी वीणा पवार, सहायक निबंधक दिलीप तिजोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

---

खासगी रुग्णवाहिकेचे बिल सरकार देईल

येत्या आठवड्यात रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. ऑक्सिजनचे योग्य नियोजन करा. प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे नाही, हे रुग्णाला आणि जनतेला डॉक्टरांनी कल्पना द्यायला हवी. ज्याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तिथे खासगी रुग्णवाहिका घ्यावी. त्याचे भाडे, डिझेल सरकार देईल, असेही त्यांनी सांगितले.

२४करमाळा-बैठक

करमाळ्यातील आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे. समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी आ. नारायण पाटील, रश्मी बागल.