शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यासाठी गर्दी करू नका

By admin | Updated: July 24, 2014 01:32 IST

मराठा समाजाच्या युवकांना आवाहन: जातीच्या दाखल्यासाठी मराठा सेवा संघाचे शिबीर

सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणाचा आदेश उशिरा आल्याने जातीच्या दाखल्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन करीत दाखल्यासाठी सोबत जोडावयाच्या कागदपत्रांची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.मराठा आरक्षण जात प्रमाणपत्र (दाखला) मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मराठा सेवा संघाच्या दत्त चौकातील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे, तहसीलदार त्रिंबक ढेंगळे-पाटील, सोलापूर विद्यापीठाचे लेखाधिकारी संजय अनपट, नानासाहेब भोसले, राम गायकवाड, श्रीकांत घाडगे, नंदा शिंदे, लता ढेरे, सुमन खपाले, गुणमाला पाटील, निर्मला शेळवणे आदी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी या आदेशाचा फायदा होणार नाही, अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना याचा फायदा होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले. शिक्षणासाठी ज्यांना सध्या आवश्यक आहे अशांनीच दाखल्यासाठी अर्ज केले तर दाखले देणे सोयीचे होईल व आरक्षणाचा फायदा होईल, सर्वांनीच गर्दी केली तर शिक्षणासाठी गरज असलेल्यांनाही दाखले देणे प्रशासनाला कठीण होईल, असे देशमुख यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे यांनी केले. यावेळी महेश सावंत, मनीषा नलावडे, अविनाश गोडसे, हरिभाऊ चव्हाण, पोपट लोंढे, राजेंद्र मिसाळ, रवींद्र पवार तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.---------------------------------आवश्यक पुरावे...१३ आॅक्टोबर १९६७ पूर्वीचा मराठा उल्लेख असलेला पुरावा हवाहिंदू बिगरमागास उल्लेख असेल तरी मराठा उल्लेख असलेला नातेवाईकांचा पुरावा हवाचसेतूमधील विहित नमुन्यातील अर्जच ग्राह्य धरला जाईलजुन्या काळातील मराठा उल्लेख असलेला कागदही चालेलजातीचा दाखला मिळाल्याश्विाय नॉनक्रिमिलेयरचा दाखला मिळत नाही------------------------------सुट्टीतही सेतू सुरू ठेवण्याची मागणी...आरक्षणाचा आदेश २२ जुलै रोजी आला तर अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया २८ जुलैपर्यंतच आहे. मराठा समाजाच्या शिक्षण घेणाऱ्या तरुणांना दाखले मिळण्यासाठी जिल्ह्यातील सेतू कार्यालये व सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याची मागणी जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे यांनी यावेळी केली. तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.