शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत दिवाळी

By admin | Updated: August 15, 2014 00:39 IST

फटाक्यांची आतषबाजी : माकप-बसपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिल्याचे कळताच महापालिकेत माकप व बसपा कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत आणि ढोल-ताशांचा निनाद करीत एकच जल्लोष केला.चंद्रकांत गुडेवारांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिल्याचे कळताच महापालिकेत दिवाळी साजरी झाली. आडम मास्तर, नलिनी कलबुर्गे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महापालिकेत येऊन आयुक्त कार्यालयावरील गुडेवारांच्या नेमप्लेटला हार घातला. फटाक्यांची आतषबाजी करून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. जनरल कामगार युनियन अशोक जानराव, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण, शाहू शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी जल्लोष केला. पी. बी. ग्रुपतर्फे लाडू वाटण्यात आले. इंद्रभवनसमोर सायंकाळपर्यंत बँजो व फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बदली झाल्यानंतर गुडेवार यांनी २७ जून रोजी पदभार सोडला होता. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर गुडेवार नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. आज न्यायालयाचा निकाल झाल्यावर ते बाहेरगावी होते. रात्री ते महापालिकेत आले व सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे पदभार घेतल्याची कागदपत्रे सादर केली. याप्रसंगी सहायक आयुक्त अमिता दगडे व इतर अधिकारी उपस्थित होते. माजी महापौर आरिफ शेख, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी त्यांचे स्वागत केले.बदली झाल्यानंतर आयुक्तांची बदली न्यायालयाने रद्द करण्याची महापालिकेच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यास बदली झाल्यानंतर नागरिकांच्या पाठबळामुळे पुन्हा पदावर रुजू व्हावे लागले आहे. आयुक्त नसल्याने गेला दीड महिना कामावर परिणाम झाला होता. पंधरा आॅगस्टच्या पूर्वसंध्येला आयुक्त रुजू झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.-----------------------------जोमाने काम करेन...सर्वसामान्य लोकांनी माझ्या विकासकामाची पावती दिली आहे. सोलापूरचा विकास हाच उद्देश ठेवून मी कामाला सुरुवात केली होती. आता दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर आणखी नव्या जोमाने काम करेन. पाणी व रस्त्याच्या प्रश्नाला माझे प्राधान्य असेल असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार म्हणाले.