शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटासाठी आलेली जोडपी ‘व्हॅलेंटाइन डे’ने पुन्हा एकत्र! कौटुंबिक न्यायालयाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 11:06 IST

पुन्हा प्रपोज करीत संसाराची दुसरी इनिंग सुरू

रुपेश हेळवे

सोलापूर : पती-पत्नींमध्ये वाद होण्यास किरकोळ कारणंही असतात. हीच कारणं घटस्फोटापर्यंत नेतात. कौटुंबिक न्यायालयही सहजासहजी घटस्फोट देत नाहीत. दोघांचे मतपरिवर्तन करते. विचार करण्यासाठी वेळही दिला जातो. दोघांचा संसार पुन्हा थाटावा, बहरावा, यासाठी सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयाने सोमवारी ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून दहा जोडप्यांना एकत्र आणले. स्वत:मध्ये परिवर्तन झालेल्या या जोडप्यांनी एकमेकांना पुन्हा प्रपोज करीत संसाराची दुसरी इनिंग सुरू करताना शेवटच्या श्वासापर्यंत संसार टिकविण्याचा शब्दही दिला.

कौटुंबिक न्यायालयात वर्षभरात अनेक तक्रारी येत असतात. यातील अनेक जोडप्यांमधील भांडण हे विकोपाला गेलेले. न्यायालयाच्या समुपदेशन केंद्रात या मंडळींचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही झाला. त्या प्रयत्नाला सोमवारी चांगलेच यश आले. विवाह समुपदेशक नूरजहाँ मुलवाड आणि कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून या दहा जोडप्यांचे मतपरिवर्तन केले. दहाही जणांनी एकमेकांना प्रपोज करून तुटलेला संसार थाटण्याचा निर्धार केला. एक पुण्याईचं काम होतंय म्हटल्यावर न्यायालयाचा परिसर फुलं अन् फुग्यांनी सजविण्यात आला होता. यावेळी डॉ. आर. एम. काझी यांची वकील मंडळी  उपस्थिती होती. 

एखाद्या जोडप्याची तक्रार आल्यानंतर आम्ही त्या दोघांचे मनोमिलन कसे होईल, यासाठी जास्त प्रयत्न करतो. यामुळेच सोमवारी घटस्फोटासाठी आलेली जवळपास दहा जोडपी पुन्हा एकमेकांसोबत नांदण्यासाठी तयार झाली. यातील काही जोडपी तर दोन-तीन वर्षांपासून एकमेकांपासून विरहित होती. ही जोडपी पुन्हा एकत्र आली आहेत. - नूरजहाँ मुलवाढ, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर