शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

व्याज सवलत योजनेमुळे जिल्हा बँका अडचणीत

By admin | Updated: July 23, 2014 00:52 IST

दरवर्षी २०० ते २६० कोटींचा तोटा: सहकार बँकांचे नाबार्डला पत्र

सोलापूर: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केल्यापासून सहकार क्षेत्राची घडी विसकटली असून, जिल्हा बँकांचा तोटा वरचेवर वाढत आहे. जिल्हा बँकांना पीक कर्ज वाटपासाठी नाबार्ड व शासनाकडून मिळणारी रक्कम व विकास सोसायट्यांना शेतकऱ्यांना वाटपासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत दोन ते सव्वादोन टक्के तोटा सहन करावा लागत असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने नाबार्डला दिले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा फायदा होत असला तरी जिल्हा बँकांना तोटा सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने नाबार्डला दिलेल्या पत्रात १३-१४ मध्ये मोठा तोटा झाला, तो यावर्षी वाढेल, असे म्हटले आहे. पीक कर्जासाठी एक लाख रुपयाला ७ टक्के व्याजदर आकारले जाते. तीन टक्के केंद्र व चार टक्के राज्य शासन व्याजाची रक्कम देते. तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जाच्या व्याजाची तीन टक्के केंद्र, दोन टक्के राज्य व दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात. यामुळे सहकारी बँकांना २६० कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचे सहकार मंत्र्यांच्या २६ जूनच्या बैठकीत बँकांचे अध्यक्ष व सरव्यवस्थापकांनी सांगितले.------------------------------सव्वा दोन टक्के व्याजाची तफावतज्या जिल्हा बँकांचा एनपीए २० टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या बँकेला राज्य बँकेकडून पीक कर्जासाठी साडेनऊ टक्के दराने कर्ज मिळते, परंतु शासनाकडून ७.२५ टक्के इतकी रक्कम व्याज परताव्यापोटी मिळत असल्याने सव्वादोन टक्के तोटा होतो. ज्या जिल्हा बँकांचा एनपीए २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्या बँकेला राज्य बँक ९.७५ टक्के दराने कर्ज देते तर शासनाकडून ७.७५ टक्के रक्कम बँकांना व्याज परताव्यापोटी मिळत असल्याने दोन टक्के तोटा होत असल्याचे सहकारी बँकेने नाबार्डला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.--------------------------नाबार्डकडून महाराष्ट्र स्टेट को-आॅप. बँकेला (राज्य बँक) पीक कर्जासाठी साडेचार टक्क्यांनी रक्कम दिली जाते.राज्य बँक हीच रक्कम जिल्हा बँकांना पाच टक्के दराने देते.जिल्हा बँका हीच रक्कम पीक कर्जासाठी विकास सोसायट्यांना चार टक्के दराने देते.व्याज परताव्यापोटी केंद्राकडून दोन टक्के तर राज्याकडून सव्वा ते पावणेदोन टक्के बँकांना मिळतात.२०१३-१४ मध्ये जिल्हा बँकांना १३ हजार ५५५ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते, प्रत्यक्षात १३ हजार ६०३ कोटी कर्ज वाटप केले.व्याज परताव्याची मिळणारी रक्कम केंद्र शासनाकडून वर्ष-दीड वर्ष मिळत नाही.केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारी व्याज सवलतीची रक्कम तीन टक्क्यांनी वाढवून देण्याची मागणी.नाबार्डकडून मिळणाऱ्या रकमेचे व्याज साडेचार टक्क्यांऐवजी तीन टक्क्यांनी देण्याची मागणी.-------------------------------------------डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे लागते. व्याज परताव्यापोटी शासनाकडून मिळणारी रक्कम व सोसायटीला दिल्या जाणाऱ्या रकमेत दोन ते सव्वादोन टक्क्यांचा फरक आहे. हा तोटा अनुदान म्हणून बँकांना द्यावा, अशी मागणी राज्यातील सर्वच बँकांच्या वतीने मी सहकार मंत्र्यांकडे केली. एकट्या जळगाव बँकेला मागील वर्षी १८ कोटींचा तोटा झाला.- आ. चिमणराव कदमअध्यक्ष, जळगाव जिल्हा बँक