शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

शेतकऱ्यांना रांगेतून वाटप केले १८० टन युरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

सांगोला तालुक्यात खरीप हंगाम २०२१ - २२साठी सांगोला तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांनी संयुक्तपणे तालुक्यात ...

सांगोला तालुक्यात खरीप हंगाम २०२१ - २२साठी सांगोला तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांनी संयुक्तपणे तालुक्यात सुमारे ३१ हजार ५०४ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित धरून रासायनिक खते बी-बियाणे कोटा मंजूर झाला आहे. त्यानुसार खरीप हंगाम सन २०२१ - २२साठी युरिया ८९५२, डीएपी ३११५, एसएसपी २२६१, एमओपी १८९६, एनपीके ४३५५ असा एकूण २० हजार ५७३ मे. टन युरिया वाटपाचे नियोजन केले आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यात आत्तापर्यंत १६ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रावर खरीप बाजरी, मका, तूर, उडीद, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या पिकांची चांगल्या प्रकारे उगवण झाली आहे. अद्याप १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी अपेक्षित असताना गेल्या आठवड्यापासून सांगोला शहर व तालुक्यातील कृषी केंद्रातून रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी कृषी दुकानदारांकडे रासायनिक खते कधी उपलब्ध होतील, अशी विचारणा करीत होते. दोन दिवसापूर्वी आरसीएफ कंपनीची पंढरपूर येथे रँक लागल्याने सांगोल्यासाठी १८० मे. टन युरिया खत उपलब्ध झाले. त्यापैकी सांगोला शहर ४० मे. टन व उर्वरित सांगोला तालुक्यातील कृषी केंद्रांना १४० मे. टन खताचा पुरवठा करण्यात आला.

कृषी केंद्रातून युरिया उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच शेतकरी दुकानांसमोर गर्दी करून रांगेत उभे राहिले होते. यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी विकास काळोखे यांनी नियोजन करून सांगोला शहरातील कृषी केंद्रासमोर रांगेतून प्रतिशेतकरी एक पोते याप्रमाणे ४० मे. टन युरियाचे वाटप केले. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळणे सुलभ झाले.

फोटो ओळ ::::::::::::

सांगोला शहरातील कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांनी युरियासाठी भल्या मोठ्या लावलेल्या रांगेचे छायाचित्र