शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धोत्रेच्या पोलीस पाटील अन् त्यांच्या मित्रावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

पोलीस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर यांची प्रकृती चिंताजनक आहे तर प्रवीण रामचंद्र सोनवणे यांना गंभीर दुखापत झाली आहे. (दोघे ...

पोलीस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर यांची प्रकृती चिंताजनक आहे तर प्रवीण रामचंद्र सोनवणे यांना गंभीर दुखापत झाली आहे. (दोघे धोत्रे ता. बार्शी) यात सुनील ऊर्फ सोन्या अंकुश गुरव धोत्रे याला संशयित आरोपी अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी प्रवीण रामचंद्र सोनवणे (वय २५, धोत्रे) ८ सप्टेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याचे बार्शीहून धोत्रे येथे आला. जेवण आटोपून मारुती मंदिराजवळ बसला होता. गावातला सुनील ऊर्फ सोन्या अंकुश गुरव हा त्याच्या दुचाकीवरून कुसळंब रोडने येऊन तिथून शिवाजीनगर बसने निघून गेला. त्यानंतर पोलीस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर व त्याचा मित्र मयूर लांडे हे दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीला सुनीलबद्दल विचारले असता तो शिवाजीनगर वस्तीकडे गेल्याचे सांगितले. पोलीस पाटलांसमवेत तोही असे तिघे दुचाकीवरून शिवाजीनगरकडे गेले. मधुकर लांडे यांच्या वीटभट्टीजवळ जाताच समोरून सुनील ऊर्फ सोन्या अंकुश गुरव त्यांना दिसला. त्याला गावात आरडाओरडा करून शिवीगाळ करू नकोस नाहीतर मी पोलीस स्टेशनला फोन करतो, असे समजावून सांगत असताना सोन्याने पाटलांना शिवीगाळ करून केली. फिर्यादी प्रवीण सोनवणे व पोलीस पाटील शाहीर जाधवर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पाटील जखमी अवस्थेत गावाच्या दिशेने पळाले. मयूर लांडे याने प्रवीणला उचलून मोटारसायकलीवर बसवून मधुकर लांडे यांच्या वस्तीवर नेले. तेथून प्रवीणला बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून पोलीस पाटील शाहीर जाधवर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे. सुनील गुरव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव हे करत आहेत.