शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

धनगर समाज आरक्षणप्रश्नी मार्ग काढला जाईल : मुख्यमंत्री

By admin | Updated: August 3, 2014 22:46 IST

शिष्टमंडळाला आश्वासन : निश्चित भूमिका ठरवा, तज्ज्ञांची समिती नेमा

कोल्हापूर : आरक्षणप्रश्नी आधी निश्चित भूमिका ठरवा. त्याबाबत चर्चा करण्यासाठी समाजातील तज्ज्ञांची समिती नेमा. समितीसमवेत चर्चा करूनच धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी मार्ग काढणे सोयीस्कर होणार आहे. आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज, रविवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री चव्हाण यांची या समितीच्या शिष्टमंडळाने विमानतळावर भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते.धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावा, अशी मागणी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. त्यावर अनुसूचित जाती-जमातींच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करावा, तसेच एस. टी. कॅटेगरीला हात न लावता आरक्षण द्यावे, अशा दोन वेगळ्या मागण्या होत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. आरक्षणासाठीचे उपोषण सोडण्यावेळी ‘महायुती’तील एका नेत्याच्या सांगण्यावरून वेगळी भूमिका घेणे योग्य नाही. अशा वेगवेगळ्या मागण्या होत राहिल्या, भूमिका असल्या, तर आरक्षणप्रश्नी कसा मार्ग काढायचा? त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका घेऊ नका. आरक्षणप्रश्नी आधी निश्चित भूमिका ठरवा. त्याबाबत चर्चा करण्यासाठी समाजातील चार-पाच तज्ज्ञांची समिती तयार करा. या समितीशी चर्चा करून आरक्षणप्रश्नी मार्ग काढला जाईल. शासनाची भूमिका सकारात्मक आहे. त्याला त्या दृष्टीने सहकार्य करा, असे त्यांनी सांगितले.शिष्टमंडळात बबन रानगे, जयराम पुजारी, नागेश पुजारी, मलकारी लव्हटे, प्रकाश पुजारी, विठ्ठल चोपडे, मच्छिंद्र बनसोडे, जयवंत ताटे, आदींचा समावेश होता. दरम्यान, येत्या काही दिवसांत आरक्षणाचा लढा व्यापक केला जाईल, असे बबन रानगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

कार्यकर्ते झाले आक्रमकदिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत आरक्षणप्रश्नी काहीच निर्णय झालेला नसल्याने मुख्यमंत्री चव्हाण यांना काळे झेंडे दाखविण्याचे नियोजन धनगर समाज आरक्षण कृती समितीने केले होते. त्यानुसार सुमारे चारशे कार्यकर्ते विमानतळावर आले होते. त्यांना पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर रोखले. आत घुसून निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसविले. त्यावर अन्य कार्यकर्ते आक्रमक झाले. हे प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी समितीच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांना मुख्यमंत्री चव्हाण यांची शासकीय विश्रामगृहावर भेटीसाठी वेळ देऊ असे सांगितले. मात्र, या नेत्यांनी विमानतळावरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर निदर्शने रद्द केली. तसेच ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले. ठरल्याप्रमाणे समितीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.