शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 12:07 IST

सोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे़ यासाठी सोलापूर शहरात सगळीकडे जय मल्हारचा आवाज घुमू लागला आहे़ मोर्चासाठी सकाळपासून धनगर समाज बांधव पार्क चौकात एकत्र जमू लागला आहे़ थोड्याच वेळात या मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे़ यात राजकीयसह इतर क्षेत्रातील नेतेमंडळी व पदाधिकारी दाखल होत आहेत़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे़ यासाठी सोलापूर शहरात सगळीकडे जय मल्हारचा आवाज घुमू लागला आहे़ मोर्चासाठी सकाळपासून धनगर समाज बांधव पार्क चौकात एकत्र जमू लागला आहे़ थोड्याच वेळात या मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे़ यात राजकीयसह इतर क्षेत्रातील नेतेमंडळी व पदाधिकारी दाखल होत आहेत़  दरम्यान, सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांच्या नामांतरासाठी धनगर समाज एकवटला आहे़ जिल्ह्यात संयोजकांनी तालुकानिहाय बैठका घेवून मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागातून सोलापूर शहरात धनगर समाज बांधव दाखल होवू लागला आहे़ पुना नाका चौकातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास गोल प्रदक्षिणा घालूनच मोर्चेकरी शहरात दाखल होत आहेत़  मोहोळ, बार्शी,करमाळा, माढा, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, माळशिरस आदी तालुक्यातील लोक मोर्चासाठी सोलापूर शहरातील पार्क चौकात एकत्र जमू लागला आहे़ साधारणत: दुपारी दोन ते तीन च्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे़ कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी मोर्चा मार्गावरील काही मार्ग बंद करण्यात आले असून त्यासाठी वाहतुक शाखेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे़ शहरात सगळीकडे वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत़