शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हक्क मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निश्चय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत, तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतराचा निर्णय राज्य शासन घेत नसल्यामुळे तिन्ही गावांच्या नागरिकांनी आपल्या हक्काच्या ...

अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत, तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतराचा निर्णय राज्य शासन घेत नसल्यामुळे तिन्ही गावांच्या नागरिकांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी २२ जूनपासून अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला प्रारंभ केला. गेली २९ दिवस साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात अकलूज, माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांसह विविध व्यापारी संघटना, सार्वजनिक गणेश, नवरात्र मंडळे, सामाजिक संघटना दररोज सहभागी होत आहेत.

आज भाजप युवा आघाडी शहराध्यक्ष दिग्विजय माने-पाटील, ग्रा.पं. सदस्य किशोर राऊत, माजी सदस्य प्रल्हाद नवगण, लालासाहेब अडगळे, सतीश व्होरा, हमीद मुलाणी, महादेव राजगुरू, अशोक राजगुरू, राजेंद्र माने, रोटरी क्लबचे नितीन कुदळे, गजानन जवंजाळ, नवनाथ नागणे, बबनराव शेंडगे, गुरुदेव वैद्य, योगेश व्होरा, केतन बोरावके, मकरंद जामदार, परीन व्होरा, पत्रकार संघटना, काझी गल्ली, गुरूनगर, शिवाजीचौक, दत्तमंदिर, राऊतनगर, जयशंकरनगर येथील नागरिक व महिला सहभागी झाले होते.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे सहकार्याचे आश्वासन

मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नातेपुतेचे उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, माजी उपसरपंच बाळासाहेब फुले यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रकरणाची सर्व माहिती दिली. यावेळी फडणवीस यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

210721\img-20210721-wa0042.jpg

अकलुज येथील साखळी उपोषणाप्रसंगी निवेदन देताना उपोषण कर्ते