शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आषाढीत फोटो व्यवसायाला मंदी

By admin | Updated: July 8, 2014 01:15 IST

फोटो व्यवसायासह विविध व्यवसायावर मंदीचे सावट

 पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विविध लहान मोठे व्यवसाय सुरू असले तरी फोटो व्यवसायासह विविध व्यवसायावर मंदीचे सावट असल्याचे चित्र सध्या पंढरपूरमध्ये पाहावयास मिळत आहे.आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये विविध देवतांचे फोटो विक्रीची जवळपास ५० ते ५५ दुकाने थाटली आहेत. फोटो विक्रीमधून आषाढी यात्रा कालावधीमध्ये जवळपास २० ते २५ लाखांची उलाढाल अपेक्षित असते. पंढरपूर शहरामध्ये फोटो तयार करून विक्री करणारे ४ ते ५ व्यावसायिक आहेत. परंतु यात्रेमध्ये थोडीफार गुंतवणूक करून काहीतरी कमाई होईल, या आशेने छोटीछोटी दुकाने थाटली जातात. यातूनच सोलापूर, इंदापूर, तुळजापूर, जेजुरी, पुणे आणि गुजरातमधून फोटो व्यावसायिक पंढरीमध्ये दाखल झाले आहेत.यामध्ये गुजरातमधून आलेल्या व्यावसायिकांकडे प्लास्टिक बॉक्स फे्रेम असणारे व त्यामध्ये विद्युत रोषणाई केलेले फोटो आकर्षक दिसत आहेत, परंतु सलग तीन वर्षे असणाऱ्या दुष्काळामुळे व अद्यापपर्यंत पावसाने दाखविलेली हुलकावणी फोटो व्यावसायिकांसाठी अडचणीचा मुद्दा ठरत आहे. फोटोच्या दुकानामध्ये १० रूपयांपासून ५०० रूपये किमतीचे फोटो दिसून येत आहेत. परंतु यामधून २० ते ४० रूपये किमतीच्या फोटोंना यात्रा कालावधीमध्ये जास्त मागणी असते. पंढरपूरमधील स्थानिक असणाऱ्या व्यावसायिकांनी नेहमीच्या १ लाख ते दीड लाखापर्यंत असणाऱ्या भांडवलामध्ये यात्रेसाठी दुपटीने वाढ केली आहे.-----------------------------वारकऱ्यांची धारणाराज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीला विठ्ठल दर्शनासाठी आलेले प्रत्येक वारकरी पांडुरंगाची आठवण म्हणून एकतरी फोटो घरी घेऊन जावे, अशा प्रकारची धारणा असते. ------------------------------पंढरपूरला पायी चालत येणारे वारकरी सर्रास शेतकरी कुटुंबातील असतात, परंतु गत तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ व जुलै महिना सुरू झाला तरीही पावसाचा पत्ता नाही. यामुळे सर्रास वारकरी पैसे खर्च करताना हात आखडता घेत आहेत. आषाढी वारीसाठी तीन वर्षे फोटो व्यावसायिकांसह इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत.- अर्जुन चव्हाणफोटो विक्रेते