शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

दिल्ली, मुंबई जिंकली; आता गाव जिंंका, ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर लढणार, सुभाष देशमुख यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 11:00 IST

-

दिल्ली, मुंबई जिंकली; आता गाव जिंंका, ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर लढणार, सुभाष देशमुख यांची माहितीआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : दिल्ली जिंकली, मुंबई जिंकली, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजप सत्तेत आला, आता आपली ग्रामपंचायत जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली़ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले, परिवर्तनाच्या लढाईत जनतेने साथ दिल्याने केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात भाजपला सत्ता मिळाली आहे़ विकासाच्या योजना गावात राबवण्यासाठी ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असली पाहिजे़ निवडणुकांची तयारी आतापासून सुरू करा़ बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीचे उपसभापती संदीप टेळे, सदस्य एम़ डी़ कमळे, शशिकांत दुपारगुडे, प्रशांत कडते, हणमंत कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, हणमंत पुजारी, यतीन शहा, सागर तेली, पंडितराज कोरे, डॉ़ चनगोंडा हविनाळे, प्रकाश सोनगे (सावकार), मल्लेशी कस्तुरे, गुरण्णा तेली, भीमाशंकर नरसगोंडे, सचिन चव्हाण, भैरू चव्हाण, धर्मा राठोड, रामचंद्र होनराव, लक्ष्मण पाटील, सिद्धाराम हेले, सुनील कळके, महादेव पाटील, मधुकर चिवरे, बनसिद्ध वडरे, अतुल गायकवाड, रावजी कापसे, संगप्पा केरके, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, राजू काकडे, रवींद्र रोकडे, बलवान गोतसुर्वे, धीरज छपेकर, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत कोठाणे, गणेश शेजाळ, नित्यानंद वारे, श्रीशैल माळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़-------------------------भाजप चिन्हावर लढणार दक्षिण सोलापूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत़ सरपंचांची निवड थेट मतदानातून होणार असल्याने या निवडणुका चिन्हावर लढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला़ पक्षाचे धोरण अद्याप ठरले नाही़ तरीही तुम्ही कामाला लागा, असे सांगत पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढण्याचे संकेत सहकारमंत्री देशमुख यांनी दिले़ -------------------------प्रभारींच्या नेमणुकाकोणत्याही स्थितीत ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापित करण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय पक्षाचे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त करण्यात आले़ अन्य गावातील भाजप कार्यकर्त्यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली़ गावात जाऊन तेथील राजकीय स्थिती, पक्षाची ताकद, अन्य गटातटांची माहिती संकलित करून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांकडे हे प्रभारी अहवाल सादर करतील़ उमेदवार निवडीपासून निवडणूक जिंकण्यापर्यंत व्यूहरचना करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे़ -------------------------या आहेत २३ ग्रामपंचायती़़़आहेरवाडी, होनमुर्गी, मंद्रुप, वांगी, बंकलगी, कंदलगाव, विंचूर, निंबर्गी, शंकरनगर, औज (मं़) गावडेवाडी, दोड्डी, कुसूर-खानापूर, शिरवळ (जै), कासेगाव, गंगेवाडी, रामपूर, दर्गनहळ्ळी, धोत्री, आचेगाव, तोगराळी, बसवनगर, वळसंग.