शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मृग नक्षत्राने ग्रामीण भागाची केली घोर निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

चालू वर्षी सांगोला शहर व तालुक्यात कडक उन्हाळ्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात बदल झाला. मृग नक्षत्रापूर्वीच मान्सूनपूर्व ...

चालू वर्षी सांगोला शहर व तालुक्यात कडक उन्हाळ्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात बदल झाला. मृग नक्षत्रापूर्वीच मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला. यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० नंतर वातावरणात बदल झाला अन‌् ३.४५च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास सांगोला शहरात पाऊस झाला. मात्र तालुक्यात मृग नक्षत्राचा पहिला पाऊस कुठेही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

हवामान खात्याने १३, १४, १५ व १९ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मृग नक्षत्राच्या पावसानंतर शेतकरी खरीप बाजरी, मका पेरणीला सुरुवात करतो. यंदा मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरणीसाठी जमिनीत ओलावा झाल्याचे शेतकरी सांगत असले तरी मृग नक्षत्राच्या पावसानंतरच शेतकरी खरीप पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरणार असल्याचे दिसून येत आहे.

३१,५०४ हेक्टरवर होणार पेरणी

चालू वर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र वाढल्यामुळे ३१ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, मटकी आदी पिकांच्या पेरण्या होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभागाने कृषी केंद्रातून रासायनिक खते, विविध कंपन्यांची बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध केली आहेत. सध्या शेतकरी कृषी केंद्रात मका, बाजरी बियाणे खरेदीसाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोट ::::::::::::::::::

खरीप हंगाम २०२१मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी बाजरी प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत अनुदान तत्त्वावर २९.२३ क्विंटल एवढे बियाणे खरेदी-विक्री संघ सांगोला यांच्याकडे उपलब्ध करून दिले आहे. उर्वरित बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑफलाइन अर्ज कृषी साहाय्यकाकडे देऊन बियाणे परवाना घ्यावा.

- दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी