तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या वतीने याबाबतचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणे यांच्याकडे देण्यात आले.
कोरोना महामारीमुळे देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात दिनांक २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान ना वीजमीटर तपासणी केली गेली, ना देयके देण्यात आली. घरातच बंद झालेल्या जनतेला या कालावधीत वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट असण्याची अवाजवी व भरमसाठ वीजबिले पाठवली.
दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी मांडल्यानंतर ऊर्जामंत्री तसेच अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठका झाल्या. यानंतर वीजबिलात कपात करण्याचा निर्णय सरकार घेईल आणि नागरिकांना दिलासा देईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिलं. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याने जनतेची फसवणूक झाली, असे मनसेचे म्हणणे आहे.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश फंड, जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे, शहराध्यक्ष सचिन कणसे, शहर उपाध्यक्ष रोहित फुटाणे, विजय हजारे, अजिंक्य कांबळे, योगेश काळे, स्वप्नील कवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : २९करमाळा-एनर्जी
वीजबिल माफीचे खोटे अश्वासन दिल्याप्रकरणी ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षकांकडे करताना मनसेचे पदाधिकारी.
----