शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

२० जानेवारीपासून सर्वांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली. भाविकांना ...

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध करून देताना करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर- देशमुख, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

१२ जानेवारीपासून रोज ८ हजार भाविकांना विठ्ठल- रुक्मिणी दर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांनतर २० जानेवारीपासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळेल. मात्र, कोरानाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येणार आहे. यामुळे लहान मुले, ६५ वर्षांपुढील नागरिक व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबरच भाविकांना ओळखपत्राची आवश्यकता असणार आहे. तसेच पूर्वीप्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग करूनदेखील भाविक त्यांच्या वेळेनुसार दर्शनासाठी येऊ शकतात, असे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर सांगितले.

वोवसायाला मंदिरात बंदी

संक्रांतीनिमित्त स्थानिक महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे; परंतु कोराना असल्यामुळे मंदिरात रुक्मिणी मातेला वोससण्यास बंदी घालण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

फोटो :::::::::::::::::::

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची बैठकीदरम्यान चर्चा करताना अधिकारी व पदाधिकारी.