शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, डाळिंब, द्राक्ष पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST

वादळी वाऱ्यात चिकमहूद येथील ७ शेतकऱ्यांच्या ६.३ हेक्‍टर क्षेत्रावरील टोमॅटो, केळी, डाळिंब फळ पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुक्‍यातील ...

वादळी वाऱ्यात चिकमहूद येथील ७ शेतकऱ्यांच्या ६.३ हेक्‍टर क्षेत्रावरील टोमॅटो, केळी, डाळिंब फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, तालुक्‍यातील ९ मंडलपैकी सांगोला, नाझरे, महूद, संगेवाडी, कोळा, शिवणे या ६ मंडलमध्ये एकूण ३३ मि.मी. (सरासरी ३.५५) पाऊस झाला आहे. मात्र, हातीद, सोनंद व जवळा या तीन मंडलमध्ये पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

सांगोला शहर व तालुक्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात तापमान अधिक होते. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने शेतीची मशागत सकाळी लवकर व सायंकाळी पाचनंतरच करीत होते. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिक, अबालवृद्धांचे लक्ष पावसाकडे लागले होते. शनिवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण, अधूनमधून ऊनही पडत होते. मात्र, सायं. ५ नंतर जोरदार वादळी वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे तुंबलेल्या गटारी मोकळ्या झाल्या.

जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पाडाला आलेला गावरान, केशर आंबा फळांचे नुकसान झाले. या वादळी वाऱ्याचा फटका द्राक्ष, डाळिंब, केळी, टोमॅटो पिकांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या, वृक्ष उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुठेही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती, तर रविवारी सकाळीही पावसाच्या सरी कोसळल्यामुळे नागरिक, अबालवृद्धांना अंगात हुडहुडी भरल्याचे अनुभवास आले. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची चिन्हे दिसून येत होती. दु. ४.३०च्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला आहे.

मंडलनिहाय पावसाची आकडेवारी

सांगोला ३ मि.मी., नाझरा २ मि.मी., महूद १२ मि.मी., संगेवाडी ३ मि.मी., कोळा १० मि.मी., शिवणे २ मि.मी. असा एकूण ३२ मि.मी. पाऊस झाला, तर हातीद, सोनंद, जवळा या तीन मंडलमध्ये पाऊस निरंक आहे.

फोटो ओळ :::::::::::::::

वादळी वारे व मुसळधार पावसात चिकमहूद येथील शेतकऱ्याचे टोमॅटो व केळीचे प्लॉट भुईसपाट झाल्याचे छायाचित्र.