शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

‘वंदे भारत’ आता ८६.४१ टक्के फूल्ल; जुलैत ४५,२४१ सोलापूरकरांचा प्रवास

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 8, 2023 18:31 IST

२८ दिवसांत : ३ कोटी ५१ लाख ५३ हजारांचे उत्पन्न

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मुंबईपर्यंतचा प्रवास जलद व्हावा, या उद्देशाने सोलापूरकरांसाठी ‘वंदे भारत’ ही एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाली. सुरुवातीला कमी प्रतिसाद लाभला. आता ही सेवा अनुभवता सोलापूरकरांचा प्रतिसाद वाढला असून, प्रवासी संख्या पाच महिन्यांत ८६.४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात २८ दिवसांत या रेल्वेने ४५,२४१ सोलापूरकरांनी प्रवास केला असून, ४८ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ कोटी ५१ लाख ५३,६४५ रुपयांचे उत्पन्न गाठले आहे.

सोलापूर रेल्वेस्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान ११ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या दिमाखात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. सुरुवातीच्या दोन महिन्यांत गाडीतील प्रवाशांची संख्या घटली. तेव्हा ५६.३ टक्केच उत्पन्न मिळाले होते. जुलै महिन्यात सोलापूर-सीएसटीदरम्यान २४ फेऱ्या आणि सीएसटी-सोलापूर २४ फेऱ्या मारत प्रवासी वाढल्याची नोंद केली.फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता सोलापूरकरांचा प्रतिसाद वाढला असून पाच महिन्यांत ही टक्केवारी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ती शंभर टक्क्यांवर आणण्यासाठी सोलापूर विभागकडून प्रयत्न होताेय. - एल. के. रणयेवले वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस