शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘निविष्ठा खरेदी’मध्ये करोडो रुपयांचा घोटाळा

By admin | Updated: August 15, 2014 00:47 IST

चौकशीअंती उघड झालेल्या घोटाळ्याची फाईल गायब

सोलापूर:कृषी खात्याच्या अनेक कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत़ शासनाच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्याची वाट कशी लावायची आणि शेतकऱ्यांच्या ‘टाळूवरचे लोणी’ कसे खायचे याचे धडे कृषी खात्यात दिले जातात़ निविष्ठा खरेदीमध्ये (शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचे पॅकेज) करोडो रुपयांचा घोटाळा प्रतिवर्षी होत असतो़ सोलापूर जिल्ह्यामध्ये तो झाला़ चौकशीत तो सिद्ध झाला; मात्र पुढे विभागस्तर आणि मंत्रालयात या घोटाळ्याची फाईल पोहोचल्यावर ती ‘गायब’ करण्यात आली आहे़चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी शासनही उभे राहत नाही आणि कर्मचारीही उभे राहत नाहीत. त्यामुळे वाशिमचे कृषी उपसंचालक अशा वर्ग एकच्या पदावर काम करणाऱ्या आणि आजवर अनेक घोटाळे बाहेर काढणाऱ्या आबासाहेब साबळे यांनी या खात्याला ‘रामराम’ ठोकला आहे़ यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मंत्रालयातील मजल्यापासून ते कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पायरीपर्यंत आणि तेथून पुढे शेतीच्या बांधापर्यंत या भ्रष्टाचाराची पाळेमुळे रोवली आहेत़ संगनमताने टोपी घालण्याच्या या प्रकारामुळे अल्पभूधारक शेतकरी योजनांपासून वंचित राहतात आणि त्यामुळेच ते आत्महत्या करुन जीवन संपवितात, हेच यातून स्पष्ट होते़ तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अशोक किरनाळी यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गैरव्यवहार केला, त्यावेळी माजी उपविभागीय कृषी अधिकारी आबासाहेब साबळे यांनी अर्ज करुन शासनाकडे तक्रार केली तरी याकडे दुर्लक्ष केले़ निविष्ठा खरेदी पद्धत आणि निकृष्ठ प्रतीच्या निविदा खरेदी करुन जिल्हास्तरीय समितीची बैठक न घेता त्यांनी मनमानी पद्धतीने खरेदी केली़ या निविष्ठा खरेदीमध्ये १५ ते २० कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे. -------------------------------कृषी खात्यात भरडधान्य योजनेत २०:२०:०० चा पुरवठा निकृष्ट व जुन्या फाटलेल्या पोत्यात झाल्याचे सिद्ध झाले होते़ छापील किंमत कमी असताना जादादराने त्या खरेदी केल्या जातात़ निविष्ठा खरेदीप्रकरणी संचालक डॉ़ एस़ एम़ अडसूळ यांच्या पथकाने चौकशी केली. अधिकाऱ्यांचे ४ एप्रिल २०१३ रोजी जबाबही नोंदविले. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक, तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अशोक किरनाळी वगळता यामध्ये दुसरे कोणी दोषी आढळले नाहीत़ अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला; मात्र तो आजतागायत ‘सापडत’ नाही हे विशेष़