शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या अल्पवयीन मुलीचा बार्शीत विवाह लावल्याने सहा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:22 IST

अलीपूर रोडवरील देशमुख प्लॉट येथे २२ एप्रिल रोजी मुलाच्या घरासमोर ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले ...

अलीपूर रोडवरील देशमुख प्लॉट येथे २२ एप्रिल रोजी मुलाच्या घरासमोर ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलीस नाईक गणेश वाघमोडे यांनी शहर पोलिसात तक्रार देताच नवरदेव रवी विवेक अडसूळ (वय २३), चुलतभाऊ श्रीनिवास अडसूळ (वय ३५), भावजय संध्या अडसूळ (वय २९), आई नम्रता अडसूळ (५३, सर्व रा. देशमुख प्लॉट बार्शी) तर वधूकडील मुलीचे आई,वडील या सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रति. अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, या दिवशी होणाऱ्या बालविवाहाची माहिती सोलापूरहून एका व्यक्तीने फोनवरून शहर पोलिसांना दिली. त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगितल्याने या वेळी हवालदार चंद्रकांत आदलिंगे, इसाक सय्यद, पोलीस नाईक गणेश वाघमोडे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी देशमुख प्लॉट येथे बालविवाहाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करताना लग्नाचा मंडप दिसला. चौकशी करताना समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त मदत मागविताच रवी विवेक अडसूळ (वय २३) याच्याशी १६ वर्ष १० महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीशी बालविवाह झाल्याची माहिती मिळाली. या विवाहाच्या वेळी वरील सर्व हजर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

दरम्यान, यातील सहा जणांना पोलिसांनी नोटिसा दिल्या तर यातील विवाहित अल्पवयीन मुलीस तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास हवालदार दत्तात्रय भालेराव करीत आहेत.

----