शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

सोलापूरच्या खादी ग्रामोद्योगकडून १० कोटींवर पतपुरवठा, साडेचार हजारांना व्यवसाय, पंतप्रधान रोजगार योजनेच्या उद्दिष्टात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:05 IST

महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाला २०१६-१७ पर्यंत ४२६ लाभार्थ्यांचे उद्दिष्टसहा कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे.देशात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुरुवात २००८-०९ पासून झाली. या योजनेसाठी सोलापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाला २०१६-१७ पर्यंत ४२६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात सहा कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. या कार्यालयाने उद्दिष्टापुढे जात ६७५ लाभार्थ्यांना या काळात नऊ कोटी ४८ लाख ९७ हजार रुपयांचा पतपुरवठा बँकांमार्फत केला. विशेष घटक योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध या घटकांकरिता २०११ ते २०१६-१७ या काळासाठी दोन हजार ३१८ लाभार्थ्यांच्या रोजगारपूर्तीसाठी दोन कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचे भौतिक उद्दिष्ट देण्यात आले होते. या काळात एक हजार २०३ लाभार्थ्यांना एक कोटी २० लाख सात हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात या कार्यालयाला यश आले. विशेष घटक योजनेत उद्दिष्टपूर्ती नसली तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर कार्यालयाचे काम चांगले असल्याची आकडेवारी आहे. लाभार्थी अनुसूूचित जाती आणि नवबौद्ध समाज घटकातील दारिद्र्य रेषेखालील प्रवर्गातून निवडायचे असल्याने जातीचा दाखला, रहिवासी दाखला ही कागदपत्रे मिळविताना लाभार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे ही स्थिती सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात आहे.मधुमक्षिका पालन उद्योगातूनही या कार्यालयाने २०१५-१६ ते १७-१८ या काळात ४६५ शेतकºयांना प्रशिक्षण दिले असून आत्मा योजनेच्या अंतर्गत हे काम सुरू आहे. आत्मा योजनेतून लाभार्थ्याला ४० ते ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१७ पासून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी २५ लाख तर सेवा उद्योगासाठी १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यात महिला, अपंग, मागास जाती प्रवर्ग, माजी सैनिकांना ३५ टक्के तर इतरांना २५ टक्के सबसिडी मिळते. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी कमिशन आयोग या तीन एजन्सीमार्फत ही योजना राज्यात राबविली जाते. --------------------------मंडळाचे कार्यराज्यातील खादी व ग्रामोद्योगाच्या विकास कार्यासाठी १९६२ मध्ये महाराष्टÑ खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. ग्रामीण क्षेत्रातील गरजूंना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर आणि बलुतेदारांना स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक वृद्धी, उद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांच्या तांत्रिक कौशल्य वाढीसाठी उत्तेजन, मालाच्या विक्रीसाठी मदत आणि प्रशिक्षण आदी उद्दिष्टांसाठी हे मंडळ कार्य करते. --------------------------जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत चालविण्यात येणाºया या कार्यालयाच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि विशेष घटक योजनांतून पारंपरिक आणि लघुउद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. मधमाशा पालन उद्योगातूनही शेतकरी आणि ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्नही करतो. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी लाभार्थी आॅनलाईन अर्ज करू शकतात. - डी. एस. भोसलेजिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, सोलापूर. 

टॅग्स :Khadiखादीjobनोकरी