शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटर रुग्णांसाठी सज्ज, मात्र बाधितांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST

मोडनिंब : बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रयत्नातून कोविड सेंटर उभारले खरे, मात्र भीती, गैरसमज यातून अनेक बाधितांनी या ...

मोडनिंब : बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रयत्नातून कोविड सेंटर उभारले खरे, मात्र भीती, गैरसमज यातून अनेक बाधितांनी या केंद्रात उपचार घेण्याकडे पाठ फिरवली आहे.

सध्या स्वामी समर्थ मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तेथे उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राची क्षमता ७० असताना येथे केवळ सहा बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात इतर केंद्रांच्या तुलनेत विरोधाभासाची स्थिती येथे पाहायला मिळत आहे.

सध्या मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये दररोज जवळपास २५ बाधित रुग्ण सापडत आहेत. मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, भेंड, बावी, सोलंकरवाडी, वरवडे ही गावे प्रभावित झाली आहेत. मात्र, बाधित आढळल्यानंतर अनेकांनी गैरसमज, भीती आणि सेल्फ आयसोलेशनच्या नावाखाली या मोडनिंबमधील उपचार केंद्राकडे पाठ फिरवली आहे. लॉकडाऊनच्या १५ दिवसात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या केंद्रात चहा, नाश्तासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली असतानाही रुग्ण येथे येण्यास टाळाटाळ करत आहेत.

----

सेल्फ आयसोलेशनला प्राधान्य

याबाबत कोरोना समितीच्या सदस्य सरपंच मीना शिंदे यांच्याशी संवाद साधला असता, रुग्णांना सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आरोग्य विभाग व पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शरद थोरात यांच्याशीही संवाद साधला असता, रुग्ण सेल्फ आयसोलेशनला प्राधान्य देत असल्याचे सांगितले.

----

फोटो : १६ मोडनिंब

मोडनिंब येथील कोविड सेंटरची क्षमता ७० असताना केवळ सहा बाधितच याठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळे उपचार केंद्र ओस पडली आहेत.