शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

कुच बिहार ट्रॉफी; पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा पहिला डाव १३५ मध्ये संपुष्टात

By appasaheb.patil | Updated: November 6, 2024 17:30 IST

केरळच्या आदित्य बैजू चे पाच तर कर्णधार अहम्मेद इम्रानचे चार बळी, एस अक्षयचे नाबाद अर्धशतक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ या १९ वर्षाखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी केरळ संघाने बाद धावा केल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १३५ धावात संपुष्टात आला तो केरळचा सलामीचा मध्यमगती गोलंदाज आदिथ्य बैजू ने घेतलेल्या ५ तर कर्णधार फिरकी गोलंदाज अहम्मेद इम्रान ने घेतलेल्या ४ बळीमुळे.

सकाळी नाणेफेक जिंकून केरळ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवत आदित्थ ने  तिसऱ्या व पाचव्या षटकात नीरज जोशी व साहिल नाळगे यांना शून्यावर बाद करत धक्के दिले. लगेचच ३१ धावांवर ३ रा गडी सुश्रुत सावंत आणि पाठोपाठ ३५ धावा असताना साहिल पारिखला बाद केला ते मोहम्मद जसील आणि आदित्थने. त्यानंतर आलेल्या कर्णधार किरण चोरमले ने (२४) यश्टिरक्षक अनुराग कवडे (२९) सोबत ४५ धावांची भागीदारी केली खरी पण दोघांना १५ धावांच्या फरकाने बाद केले ते कर्णधार मोहम्मद इम्रान याने (२९ धावात ४ बळी).  त्यापुढील केवळ ११ धावात महाराष्ट्राने पुन्हा तीन गडी - पार्थ देवकर (०), कार्तिक शेवाळे (०), ओम भाबड (१२) गमावले. 

जेवणाला खेळ थांबला तेव्हा ७ बाद १०३ धावसंख्या होती. त्यानंतर तळातील गडी योगेश चव्हाण ने थोडाफार प्रतिकार करत धावसंख्या १३५ पर्यंत नेली पण आदिथ्य ने त्याचा २४ धावात ५ वा बळी मिळवत महाराष्ट्राचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ४१ व्या षटकात संपुष्टात आणला तो जेवणानंतर केवळ ७ षटक झाल्यावर. केरळच्या पहिल्या डावाची सुरूवात देखील डळमळीत झाली ती निलय शिंगवी ने तिसऱ्याच षटकात घेतलेल्या बळी मुळे. सलामीवीर अहमद खान (८) याच्यानंतर चहापानाच्या आधीच्या शेवटच्या चेंडूवर ओम भाबड कडून दुसरा गडी - एस.सौरभ (२१) बाद झाला तेंव्हा धावसंख्या झालेली ५८.

चहापान नंतर यष्टीरक्षक फलंदाज एस एस अक्षय आणि कर्णधार मोहम्मद इमरान यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५०+ धावांची भागीदारी करत धावसंख्या शंभर पार नेली. अक्षय ने ८४ चेंडूत ६ चौकारानिशी त्याचे अर्धशतक साजरे केले. ९९ धावांची भागीदारी झालेली असताना कर्णधार मोहम्मद इम्रान (३९) बाद झाला. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा ४७ षटकात केरळ संघाने ३ बाद १६५ धावा केलेल्या एस अक्षय नाबाद ६९ (९ चौकार) , थॉमस मॅथ्यू ६ धावांवर खेळत असून ३० धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून फाजिल मोहम्मद तर मैदानी पंच म्हणून अच्युत व सुद अभिरूपे हे आणि गुणलेखक म्हणून दोन्ही महिला केतकी नाईक जामगावकर व पूर्णिमा आपटे आणि ACLO म्हणू  चंदन गंगावणे काम पाहत आहेत.