शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर प्रशिक्षण केंद्रात राज्यातील ६२९ महिला पोलीसांचे दीक्षांत संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 14:37 IST

सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़ यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली़ त्यानंतर परेड व प्रशिक्षणार्थी पोलीसांनी शानदान संचलन केले़ यावेळी परेड कमांडर म्हणून पूनम गुंड, छाया उडतेवार, अंकिता मोहोळ, रेखा आगलावे, ज्योती फरकटे, अक्षता माळी व कविता साळुंखे यांनी आपले प्लाटून मार्च केले़ यावेळी सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १० यांचे बॅन्ड पथक कार्यरत होते़ -----------अक्षमा माळी सर्वोत्कृष्टया प्रशिक्षणात मुंबई रेल्वेची प्रशिक्षणार्थी अक्षता रमण माळी ही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरली़ याशिवाय पूनम शिवाजी गुंड (व्दितीय - पुणे ग्रामीण), सुप्रिया बाळासाहेब भोईटे (तृतीय - मुंबई शहर), गोळीबार प्रकारात पूनम शिवाजी गुंड ही प्रथम तर चांदणी देवीदास कोंढे व अंबिका विलास जाधव या दोघींनी व्दितीय क्रमांक पटकाविला़ या कार्यक्रमावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांनी अहवाल वाचन केले़  त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींना शपथ दिली़ दीक्षांत संचलनानंतर प्रशिक्षणार्थी पोलीसांनी लेझीम, अदिवासी नृत्य व कमांन्डो सायलेन्ट ड्रिल असे विविध कार्यक्रम सादर केले़ या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, प्रशिक्षणार्थींचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते़ --------------पोलीस शिपाई हा महत्वाचा कणा : तांबडेपोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले़ पुढे बोलताना तांबडे म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने पोलीस खात्यावर आहे़ वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे, दहशतवाद यासारख्या गुन्ह्याचे आवाहन आता पोलीस दलासमोर असल्याचेही नमुद केले़