कुडरूवाडी: बेरोजगारीचे प्रश्न, महिलांच्या रोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रमागासारखे घरगुती उद्योग उभे करण्याचा आपला मानस आहे. आजपर्यंत अनेक जण
मतदार संपर्क अभियानांतर्गत कुडरूवाडी शहरात कॉर्नर सभा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी सुवासिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण करून तर युवा वर्गाने फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.
कॉर्नर बैठकीची सुरुवात पंचशीलनगर येथून करण्यात आली. यावेळी संजय शिंदे म्हणाले, आतापर्यंत शिंदे कुटुंबीयांनी सूतगिरणी, साखर कारखाना, आसवनी प्रकल्पासह अनेक प्रकल्प उभे करून तरुणांच्या हाताला रोजगार, उसाला उत्तम भाव देण्याची कामे केली आहेत.
संजय शिंदे हेच आमचा पक्ष आणि मतदारसंघातील विकासयात्री असल्याचे डॉ. करंदीकर यांनी सांगितले. तर शहरातील अनेक गटतट विसरून केवळ संजय शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन अमरकुमार माने यांनी केले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक वामनराव उबाळे, मारुतीआबा बागल, माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी, नवृत्ती गोरे, माढा तालुका मोटारमालक संघाचे अध्यक्ष दत्ताजी काकडे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष सुरेश बागल, संजय गोरे, अर्जुन बागल, बाबा गवळी, बबनराव बागल, डॉ. जयंत करंदीकर, उमरसाहेब दारुवाले, स्वातंत्र्यसैनिक भगवान जवंजाळ, पद्माकर काशीद, राजाभाऊ भाटे, महेश गांधी, युसूफ दाळवाले, अमरकुमार माने, लतीब मुलाणी, सूर्यकांत गोरे, अरुण काकडे, राजाभाऊ सुसलादे, संतोष अनभुले, अण्णासाहेब ढाणे वस्ताद, आनंद रजपूत, संजय साठे, प्रभाकर गोरे, दिलीप सोनवर, गणेश गोरे, संजय अस्वरे, अतुल फडतरे, अशोक चव्हाण, लक्ष्मण अस्वरे, अफसर मुलाणी, हरिदास बागल, संभाजी चौधरी, पांडुरंग सुतार, शंकर बागल, राहुल गायकवाड, मुन्ना अनंतकवळस, शरद काळे, पप्पू भिसे, दर्शन काशीद, अनिल खडतरे, अरुण इंगोले, संतोष शिंदे, आनंद टोणपे, बबलू कांबळे, सोनू मोरे, सचिन वाळके, संदीप भराटे, सागर गोफणे, सतीश महिंगडे, सुनील मुसळे, अमित खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
२७ ठिकाणी कॉर्नर सभा
■ पंचशीलनगर, नालसाहबनगर, सावित्रीबाई फुलेनगर, बालाजीनगर, रेल्वे वसाहत, देवकते वस्ती, आदर्शनगर, आवताडे वसाहत, भीमनगर, गोल काडादी चाळ, सिद्धेश्वरनगर, साई कॉलनी, वाघ वस्ती, चौधरी प्लॉट, भूषण लॉजजवळ, दाळवाले गल्ली, राधाकृष्ण नगर, म्हसोबा गल्ली, शिवाजी चौक, ठोकडे मिल, पटेल चौक, पोर्टर चाळ, कै. दशरथ गोरे नगर, भारत गॅस गोडावूनजवळ, फिल्टर पंप, गीताबाईचा मळा अशा २७ ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आल्या.