शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फूट टाळण्यासाठी काँग्रेसचा व्हीप

By admin | Updated: September 2, 2014 16:35 IST

महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

सोलापूर : महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसने सोमवारी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन व्हीप बजावला तर राष्ट्रवादीनेही उपमहापौरपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पक्षश्रेष्ठींकडे नावांची शिफारस पाठविली आहे. महेश कोठे यांच्या पक्षांतरामुळे या निवडणुकीत विरोधकांची सरशी होऊ नये म्हणून काँग्रेसने ही सतर्कता बाळगली असल्याचे दिसून आले.शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांची काँग्रेस भवनात बैठक घेतली. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस नगरसेवकांची संख्या मोठी असल्याने महापौर काँग्रेसचा होणार आहे. पण काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेल्या महेश कोठे यांच्यामुळे विरोधक काही तरी दगाफटका करतील या भीतीने काँग्रेसने ही सतर्कता बाळगली आहे. कोठे बाहेर पडल्यामुळे काँग्रेसची संख्या ४५ झाली आहे. त्यात एका अपक्षाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. या बैठकीला महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे, चेतन नरोटे यांची अनुपस्थिती होती. शहर अध्यक्ष यलगुलवार यांनी पक्षाचा व्हीप सर्व नगरसेवकांना सांगितला. महापौर निवड होईपर्यंत कोणीही इतर पक्षाकडून येणार्‍या कागदावर किंवा अन्य ठिकाणी सह्या करू नयेत. प्रत्येक जण संपर्कात राहावे. सभापतींना नगरसेवकांची जबाबदारी देण्यात आली. महापौरपद अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांबाबत चर्चा झाली. त्यात सुशीला आबुटे, श्रीदेवी फुलारे, अनिता म्हेत्रे यांची नावे आघाडीवर आहेत. नरोटे यांना पक्षाचा व्हीप पाठविण्यात आला आहे.इकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या सूचनेवरून उपमहापौरपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महिलांना प्राधान्य द्यावे असे गादेकर यांनी सुचित केले असले तरी नाना काळे, मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे यांनी प्रवीण डोंगरे यांच्या नावाची शिफारस केली आहे. तर या पदासाठी बिस्मिला शिकलगार, सुनीता रोटे, शांताबाई दुधाळ यांनीही मुलाखती दिल्या आहेत. मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा दिवस आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-भाजपाने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून तयारी केली आहे. महापौरपदासाठी भाजपातर्फे सुनीता गदवालकर यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची मंगळवारी सकाळी ११ ते ३ मुदत आहे. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी या दोन्ही पदांची निवड होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी हे काम पाहणार आहेत. - ए. ए. पठाण, नगरसचिव काँग्रेस भवनात नगरसेवकांची बैठक घेतली. सर्व नगरसेवकांना पक्षाचा व्हीप दिला आहे. महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांची नावे प्रदेश कार्यालयास पक्षाध्यक्षांनी पाठविली आहेत. मंगळवारी फॅक्सद्वारे कोणाचे नाव येईल त्यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे.- संजय हेमगड्डी , सभागृह नेते