शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

आॅनलाईनवर तक्रार येताच घेतली गेली फिर्याद !

By admin | Updated: July 8, 2014 00:59 IST

तीन दिवसांमध्ये १३ हजार ८९६ जणांची वेबसाईटला भेट

सोलापूर : एरव्ही साधी तक्रार अथवा फिर्याद घेण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात; मात्र आॅनलाईन तक्रार घेण्याच्या अद्ययावत यंत्रणेने त्यावर मात झाल्याचे एकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले. एकाने आॅनलाईनवर मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार नोंदवताच वरिष्ठांनी तातडीने दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, तीन दिवसांमध्ये ६६६.२ङ्म’ंस्र४१ू्र३८स्रङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटला १३ हजार ८९६ जणांनी भेट दिल्याचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्तालयाची नवी वेबसाईट तयार करण्यात आली असून, तीनच दिवसांपूर्वी ती सर्वसामान्यांच्या सेवेत रुजूही झाली. रविवारी आॅनलाईनवर पहिलीच तक्रार दाखल झाली. कुंभारवेस भागातील नागरिक महेश दामोदर कस्सा यांची मोटरसायकल (एमएच-१३/एटी-८१७४) १० जुलै २०१३ मध्ये चोरीस गेली होती. त्याबाबत त्यांनी तक्रार अथवा फिर्याद देण्यासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गेले; मात्र पोलिसांनी टाळाटाळ करीत त्यांची फिर्याद दाखल करून घेतलीच नाही. दरम्यान, त्यांनी थेट आॅनलाईनवर आपली तक्रार नोंदवली. वरिष्ठांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कानोसा घेतला. कस्सा यांची तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास येताच वरिष्ठांनी त्यांची रीतसर फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षकाला दिले. वर्षभरापूर्वी झालेल्या चोरीची तक्रार अथवा फिर्याद घरबसल्या आॅनलाईनद्वारे नोंदवता येते, ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब आहे. --------------------------------दोनदा संकेतस्थळ पाहा- पोलीस आयुक्तनव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ (वेबसाईट) हे जनतेसाठी फायदेशीर आहे. कोणाच्या तक्रारी तर कोणाला पोलिसांविषयी काय वाटते आदींची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील संकेतस्थळ दिवसांमधून दोनदा उघडून पाहत चला, असा कानमंत्र पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा आणि इतर अधिकाऱ्यांना दिला आहे.