शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आयुक्त म्हणाले धमकावू नका

By admin | Updated: September 30, 2015 13:13 IST

पर्यायी व्यवस्था न करता सार्वजनिक शौचालयाचे पाडकाम केल्याच्या प्रकरणाचा स्मार्ट सिटीशी संबंध जोडल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील संतापले.

सोलापूर : पर्यायी व्यवस्था न करता सार्वजनिक शौचालयाचे पाडकाम केल्याच्या प्रकरणाचा स्मार्ट सिटीशी संबंध जोडल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील संतापले. महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अशोक निंबर्गी यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना काळम-पाटील यांनी मला धमकावू नका, असा शब्दप्रयोग केल्यामुळे विरोधकांनी गोंधळ केला. 
महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सभा महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी झाली. सभेच्या सुरुवातीस अशोक निंबर्गी यांनी प्रभाग ३४ मधील शौचालयाचे पाडकाम पर्यायी व्यवस्था न करता करण्यात आल्याबद्दल लक्षवेधी केली.
हे शौचालय कोणाच्या सांगण्यावरून पाडण्यात आले. आयुक्त स्मार्ट सिटीची चर्चा करीत आहेत तर दुसरीकडे अधिकारी बेकायदेशीरपणे कामे करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे आयुक्त काळम-पाटील संतापले. 
स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने शौचालय पाडकामाचा संबंध येत नाही, घडल्या प्रकाराची मी चौकशी करेन, असे त्यांनी उत्तर दिले. त्यावर निंबर्गीही तावातावाने बोलू लागले. स्मार्ट सिटीचा कसा संबंध नाही. विभाग प्रमुख म्हणून तुम्ही सर्व कामांना जबाबदार आहात. 
स्मार्ट सिटीची जबाबदारी वाटून द्या व कामात लक्ष घाला. स्मार्ट सिटीच्या नावावर काय चाललेय, असा सवाल केला. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी स्मार्ट सिटीचा प्रत्येक गोष्टीशी संबंध लावलात तर मी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. यावर निंबर्गी यांनीही तितक्याच त्वेषाने उत्तर दिले. मला तोंड उघडायला लावू नका. महापालिकेत कशाच्या जीवावर काय चाललेय हे जर मी बोललो तर पाहा. यावर लागलीच आयुक्त काळम-पाटील यांनी मला धमकावू नका, असे प्रतिउत्तर दिले. यामुळे संजय कोळी, शिवानंद पाटील, नरेंद्र काळे, नागेश वल्याळ, इंदिरा कुडक्याल, पांडुरंग दिड्डी यांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. यामुळे गोंधळ वाढला. 
शेवटी सभागृह नेते संजय हेमगड्डी व महापौर आबुटे यांनी मध्यस्थी करून आयुक्त उत्तर देत आहेत. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे म्हणत विरोधकांना शांत केले. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी विभागीय अधिकारी रेगळ यांना याबाबत विचारणा केली. संबंधित शौचालय पाडण्याचा स्थायी सभेत ठराव झाल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांची परवानगी घेतली का, असा सवाल निंबर्गी यांनी केला. त्यावर रेगळ निरुत्तर झाले. पैशाची देवाणघेवाण करून सार्वजनिक शौचालय पाडले जात आहेत. सभागृहात चुकीचे विषय असून त्या आधारावर हे घडत आहे. अंमलबजावणी करताना अधिकार्‍यांच्या हे लक्षात येत नाही का?. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी बुधवारी दुपारी १ वा. घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यावर प्रकरणावर पडदा पडला. 
 
■ बजेटमध्ये महिला शौचालयासाठी तरतूद केली; पण शौचालये बांधली नाहीत, निधी गेला कुठे? अशी लक्षवेधी रोहिणी तडवळकर यांनी केली. हा विषय निघाल्यावर अलका राठोड, बिस्मिल्ला शिकलगार याही तुटून पडल्या. त्यावर नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी १0 कामे हाती घेतली होती, ३ पूर्ण झाली तर ७ ठिकाणी विरोध झाल्याचे सांगितले. अलका राठोड यांनी हे काम सारिका आकुलवार पाहत होत्या, असे सांगितल्यावर आकुलवार यांनी ६ कामे फेरटेंडर करण्यात आल्याचे सांगितले. लोक मुद्दाम विरोध करीत असतील तर पोलीस बंदोबस्तात काम करा, असे आदेश महापौर आबुटे यांनी दिले. ■ यु. एन. बेरिया यांनी एसएमटी (परिवहन उपक्रम) मध्ये चाललेल्या गोंधळावर लक्षवेधी केली. नवीन १६0 पैकी ५0 गाड्या बंद आहेत. १0 व्हॉल्व्होपैकी ७ बंद, भंगारामध्ये पॅकिंगसह नवीन पार्ट घालताना मी पकडले आहे. नव्या बसचे टायर जुन्या बसला चढविले जात आहेत, असा आरोप केला. व्यवस्थापक खोबरे आजारी असल्याने पुढील सभेत यावर चर्चा करण्याचे ठरले. आनंद चंदनशिवे यांनी कारंबा नाका येथे महामार्गाच्या कामामुळे ड्रेनेजलाईन दबल्याने ३३ अपार्टमेंट, २0 नगरांना घाण पाण्याचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनाला आणले. हेमगड्डी यांनी महामार्ग विभागाच्या चुकीमुळे हे घडल्याने त्यांच्याकडून काम करून घ्यावे, अशी सूचना केली. त्यावर आयुक्तांनी एस्टिमेट तयार करण्याच्या सूचना केल्या.
 
(प्रतिनिधी)