शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त गुडेवार आज रुजू होणार

By admin | Updated: May 8, 2014 10:44 IST

नगरसेवकांमुळे नाराज झालेले सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे आज पुन्हा सेवेत रुजू होणार आहत.

जनतेच्या लढ्याला यश : सोलापूर बंदला प्रतिसाद, प्रधान सचिवांची सरंक्षण देण्याची भाषा

सोलापूर : महापालिकेचे धडाकेबाज आयुक्तचंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनासाठी शहरात सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी यश आले़ नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी आयुक्तांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देऊ़ तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आणि रुजू व्हा, असे सांगितल्याने गुडेवार गुरुवारी दुपारी महापालिकेची पुन्हा सूत्रे स्वीकारणार आहेत़ बुधवारी आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर बंदची हाक देण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयावर पाच विविध ठिकाणांहून मोर्चे काढण्यात आले़ गर्दी कमी असली तरी प्रमुख बाजारपेठा बंद होत्या़ दुपारी आयुक्त गुडेवार यांनीच आपण पुन्हा गुरुवारी महापालिकेत रुजू होत असल्याचे जाहीर केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले़ काँग्रेस नगरसेवकांनी सोमवारी दुपारी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करीत ‘पाणी द्या, नाही तर खुर्ची खाली करा’ अशी घोषणाबाजी केल्यामुळे गुडेवार यांनी अवघ्या पाचच मिनिटांत शासनाला पत्र पाठवून पदभार सोडला आणि आंदोलनकर्त्यांच्या हातात पत्र दिले होते़ चांगल्या अधिकार्‍यासाठी शहरातील लोक रस्त्यांवर उतरले. युवा संघटना, बिगर राजकीय संघटना यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलने करीत गुडेवार यांना पाठिंबा दिला़ कुठे सह्यांची मोहीम तर कुठे मोर्चे, कुठे काळ्या फिती लावल्या तर कुठे रास्ता रोको केला़ शहरातील वातावरण ढवळून निघाले़ (प्रतिनिधी)

सोलापूरकरांचा मी आभारी!

नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी मला महापालिकेत पुन्हा रुजू होण्याचे सांगितले़ त्यामुळे गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत मी महापालिकेत येऊन पुन्हा पदभार स्वीकारणार आहे़ सोलापूरकरांचे मी मनापासून आभार मानतो़ - चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त