कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अनुषंगाने
कृषी वीज बिल सवलत योजना अनेक वर्षांनंतर आली आहे. या योजनेचा करमाळा तालुक्यातील खडकी गावातून सुरुवात करण्यात आली. यावेळी
उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, शाखा अभियंता सुनील पवार, सहाय्यक लेखापाल कैलास लोंढे, गाठे, खडकीचे तारतंंत्री सुनील कामटे, मनोहर साळुंके, गणेश क्षीरसागर, अंधारे, शेरे, नितीन पाटील, कृष्णदास कामटे, आदी जनमित्र उपस्थित होते.
यावेळी मकाई कारखान्याचे माजी संचालक सुभाष शिंदे, खडकीचे सरपंच बळीराम शिंदे, ग्रामसेवक रंजना उंडे, मोहन शिंदे, अमोल नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जनमित्रानी या योजनेमधील नवीन शेतीपंप वीज सवलतीची माहिती दिली. यावेळी ग्राहकांनीही संबंधित माहिती समजून घेऊन या योजनेत भाग घेतला. या शेतीपंपाच्या ग्राहकाने १.९७ लाख रुपयांचा भरणा करून ७/१२ वीज बिलापासून कोरा करुन सहभाग नोंदवला. यामध्ये हिंमत शिंदे, विठ्ठल शिंदे जातेगाव, शालन शिंदे, सुभाष शिंदे, अमित शिंदे यांचा समावेश आहे. यावेळी ईश्वर खरात, संदीप वाघमारे, भरत मिरगे आदी मान्यवर ग्राहक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व ग्राहकांनी या फायदेशीर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी केले आहे.
--- ०३करमाळा-एमएसईबी--