सोलापूर : विद्युत मोटारीतून विजेचा धक्का बसल्याने महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान पडसाळी शिवारात घडली. भैरवनाथ लक्ष्मण पवार (वय-२०, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) असे मरण पावलेल्याचे नाव आहे. भैरवनाथ हा वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात बी. एस्सी़ अॅग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मंगळवारी सुटी असल्याने तो आपल्या शेतात गेला होता. शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला असता अचानक त्याला विजेचा धक्का बसला. त्यात तो जागीच मरण पावला. शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मरण पावला. तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, तपास हवालदार सुनील चवरे करीत आहेत.
महाविद्यालयीन युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By admin | Updated: July 30, 2014 01:20 IST