शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

गरिबांच्या साहित्य वाटपाला आचारसंहिता

By admin | Updated: June 9, 2014 00:55 IST

जिल्हा परिषद : नियम अभ्यासून विचारणारा नसल्याने प्रशासनाचे राज्य

सोलापूर: कर्मचाऱ्यांच्या बदल्या व ठेकेदारांची कामासाठी अडचण नाही. नियोजन मंडळाच्या बैठकीत पालखी मार्गाच्या नावाखाली पाहिजे ती कामे मंजूर केली जात असताना जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वसामान्यांची मुस्कटदाबी सुरू ठेवली आहे. गावात बसविले जाणारे ऊर्जा बचत दिवे, मागासवर्गीय, गरीब कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या साहित्य वाटपावर प्रशासनाने बंदी घातली आहे. पदाधिकाऱ्यांना वेळच नसल्याने प्रशासनाचा वाट्टेल तसा कारभार सुरू आहे.पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचे कारण पुढे करीत जिल्हा परिषद प्रशासनाला वाट्टेल तसा सोयीचा कारभार सध्या जिल्हा परिषदेचा सुरू आहे. कर्मचारी बदल्याची प्रक्रिया सुरू असतानाच पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली. ग्रामविकास खात्यानेच स्थगिती दिली अन् ती उठवलीही. ठेकेदारांच्या कामालाही आचारसंहितेची अडचण नाही, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी मात्र जिल्हा परिषद आचारसंहितेचे पालन कडकपणे राबवत आहे. महिला व बालकल्याण खाते, समाजकल्याण खाते व कृषी खात्याकडून वैयक्तिक साहित्य अनुदानावर दिले जाते. कृषी औजारे, ताडपत्री,फवारणी पंप, शिलाई मशिन, भांडी, नांगर, विद्युत मोटार व अन्य औजारे अनुदान तत्त्वावर दिली जातात. हे साहित्य मागासवर्गीय कुटुंबांना दिले जाते. नेमक्या याच वाटपावर जिल्हा परिषद प्रशासनाने बंदी घातली आहे. १० टक्के रक्कम भरणाऱ्यास ग्रामपंचायतींना ऊर्जा बचत दिवे दिले जातात. दिवे बसविण्याची फाईलही अडविण्यात आली आहे.----------------------------------विचारणारेच कोणी राहिले नाही !महानगरपालिका घरांसाठी सोडत काढते. कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात, पदाधिकाऱ्यांना गाड्या मिळतात, परंतु मागासवर्गीय, गरीब कुटुंबाचे वैयक्तिक साहित्य वाटप बंद आहे. श्रीमंतांना आचारसंहिता नाही परंतु गरिबांसाठी मात्र जिल्हा परिषद प्रशासन कडक आचारसंहिता राबवत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर गाड्या मिळाल्या नसल्याने प्रशासनाला एकेरी भाषेत सुनावणारे पदाधिकारी वैयक्तिक साहित्य वाटपासाठी विचारणा करु शकत नाहीत. कारण कोणाला त्यांच्यासाठी वेळच मिळत नाही.-----------------------------दोन हजार सौरदिवे बसवलेएकीकडे जि.प. गरीबांच्या वैयक्तीक लाभाच्या वाटपाला आचारसंहिता दाखवित असताना दुसरीकडे थेट शासनाकडून आलेले दोन हजार सौरदिवे गावागावातील दलित वस्तीमध्ये बसविले जात आहेत. ऐन आचारसंहितेच्या कालावधीत हे सौरदिवे बसविल्याने आचारसंहिता भंग होत नाही का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शासन पातळीवरुनच दलित वस्तीची नावे अंतिम करण्यात आली आहेत. --------------------------------आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन जनतेची अडवणूक करीत आहे. एखाद्या गरीब कुटुंबातील महिलेला भांडी मिळाली व तीच्या मुलीच्या संसारासाठी उपयोगी आली तर आचारसंहिता भंग होईल का?.-शिवाजी कांबळेसमाजकल्याण सभापती-------------------------अन्य कोणासाठीही आचारसंहितेची अडचण नाही. केवळ वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीच आचारसंहिता का?. सीईओंना याबाबत यापूर्वीही मी बोलले आहे अन् आजही बोलत आहे.-जयमाला गायकवाडसभापती महिला व बालकल्याण