शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीआय’ची ग्राहक सेवा केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:06 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) ग्राहक सेवा केंद्रे १ एप्रिल २०१८ पासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे.

- संताजी शिंदे सोलापूर : स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) ग्राहक सेवा केंद्रे १ एप्रिल २०१८ पासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे. त्यामुळे देशात ४,४५४ वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.ग्रामीण भागातील लोकांची नाळ राष्ट्रीयीकृत बँकेशी जोडण्यासाठी २0१0 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अर्थसंकल्पात बँकिंग सेवा देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी २ हजार लोकसंख्येच्या गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू केले. खाते उघडण्यासाठी वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींची निवड केली होती. प्रतिनिधींना बँकेत खाते उघडणे व अन्य ट्रान्झॅक्शनवर कमिशनच्या स्वरूपात मानधन दिले जात होते.अटल पेन्शन, जीवनज्योती, सुकन्या योजना, व्यक्तिगत अपघात विमा, शिष्यवृत्ती, सामाजिक अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती ग्राहकांना मिळत असताना वर्षभरापासून ही सेवा बंद करण्याचा घाट घातला जात होता. त्याविरोधात वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींनी १९ सप्टेंबर व २१ मार्चला मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही.>३१ मार्चला मुंबईत स्टेट बँक एलएचओ कार्यालयात व्यवसाय प्रतिनिधींच्या करस्पॉडंट वेल्फेअर असोसिएशन सोबत बैठक झाली. त्यात तुमचा करार संपल्याचे सांगण्यात आले. १ एप्रिल २0१८ पासून राज्यातील ४४५ प्रतिनिधींसह देशभरातील सुमारे ४,४५४ हजार तरूणांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली, असे करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष राजाराम आवळे यांनी सांगितले.

टॅग्स :SBIएसबीआय