शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आयुक्तांच्या समर्थनार्थ आज बंद

By admin | Updated: May 7, 2014 00:39 IST

भाजप, सेना, माकप, बसपा, मनसे आदींचा सहभाग : पाच ठिकाणांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे

सोलापूर: महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनासाठी तसेच सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविण्यासाठी विरोधकांनी बुधवारी सोलापूर बंद पुकारला आहे़ भाजपचे आ़ विजयकुमार देशमुख तसेच माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह विविध पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली़ शहरातील पाच विविध ठिकाणांवरून बुधवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाण्याचे निमित्त करुन सोमवारी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले़‘पाणी द्या पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा दिल्या़ त्यामुळे अपमानित झालेल्या गुडेवार यांनी तडकाफडकी पदभार सोडून शासनाकडे बदलीची मागणी केली होती़ यामुळे मंगळवारी सोलापूर विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले़ मनपा कामगारांनी एकत्र येऊन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सकाळी एक तास आंदोलन झाल्यावर जनतेला वेठीस धरु नये म्हणून हे आंदोलन स्थगित करण्यात आले़ सायंकाळी मनपा प्रवेशद्वारावर माकप आणि बसपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ पूर्व भागातील दत्तनगर, एस.टी. स्टँड, कन्ना चौक, रेल्वे स्टेशन येथून हे मोर्चे निघणार आहेत. गुडेवारांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत़ शहराला २०० बस मंजूर केल्या आहेत, कर्मचार्‍यांना नियमित वेतन सुरू झाले आहे. पाण्याचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून आहे, तो सोडविण्यासाठी त्यांनी १६७ कोटींची योजना शासनाकडून मंजूर करुन घेत आहेत़ सत्ताधारी पक्षामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पाण्याचे निमित्त असले तरी दुकानदारी बंद झाल्यामुळे आयुक्तांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवक आहेत, असा आरोप आडम मास्तर यांनी केला़ बुधवारी होणार्‍या बंदमध्ये शहरातील सर्व गुडेवारप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले़ या पत्रकार परिषदेला प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, अशोक निंबर्गी, नरेंद्र काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)