शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

'शहर मध्य'मध्ये रंगणार चौरंगी लढत!

By admin | Updated: September 24, 2014 13:52 IST

सातत्याने तिरंगी लढतीत आलटून पालटून कौल देणार्‍या 'मध्य'मध्ये यंदा 'एएमआयएमआय' च्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

जगन्नाथ हुक्केरी■ सोलापूर
शहराच्या पूर्व भागातील यंत्रमाग, विडी कामगारांची लोकवस्ती आणि संमीश्र जाती समुदायांचे वास्तव्य असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात राजकीय हालचाली वेगात सुरू असून,सातत्याने तिरंगी लढतीत आलटून पालटून कौल देणार्‍या 'मध्य'मध्ये यंदा 'एएमआयएमआय' च्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. लढत चौरंगी असली तरी येथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शिवसेनेचे महेश कोठे आणि माकपचे नरसय्या आडम यांच्यातच मतांसाठी मोठा संघर्ष होणार आहे.
काँग्रेसमध्ये इतकी वर्षे वाट पाहून हाती काहीच लागत नाही, याचा अंदाज आल्याने महेश कोठे यांनी थेट भगवा हातात घेऊन शिवबंधनात अडकले आणि प्रचाराला सुरूवात केली. तर एकेकाळी काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष तौफिक शेख यांनीही काँग्रेसशी फारकत घेत 'एएमआयएमआय'च्या वतीने नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. माकपाचे माजी आ. नरसय्या आडम यांचा पारंपरिक व हक्काचा मतदारसंघ असल्याने त्यांची तयारी गत पाच वर्षांपासून सुरूच आहे. आडम यांच्या कामाच्या पद्धतीमुळे सर्व समाजाची मते पडतात. मतदारांचा कौल बदलला किंवा प्रसंगानुसार आडम यांच्याबरोबर असलेले मतदार अन्य उमेदवारांच्या पाठीशी उभेही राहतात. या बाबी आजपर्यंत घडत आल्या आहेत. 
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघावर पकड घट्ट बसवत संपर्क वाढविला. विकास कामेही त्यांच्याकडून झाली. सत्तर फूट रोड परिसर, अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी., हद्दवाढ भागातील रस्त्यांच्या कामांबरोबरच विडी कामगार, यंत्रमागधारक आणि उद्योजकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचे काम करून मतदारांना काँग्रेस सोबत ठेवण्याचा आ. शिंदे यांनी केलेला प्रयत्न मोठा आहे. मतदारसंघात प्रभाग व वॉर्डनिहाय आधारकार्ड, मतदान कार्ड, राजीव गांधी आरोग्य विमा, बांधकाम कामगारांना कार्ड व धनादेश वाटप करून शासकीय योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्याच्या कामात आ. प्रणिती शिंदे यांचा पुढाकार आहे. जनहिताच्या योजनांची माहिती जनतेला करून देण्यात आ. शिंदे या पुढे आहेतच तर जनतेच्या न्याय- हक्कासाठी आंदोलने आणि मोर्चा काढून आवाज उठविण्याचा आडम यांच्या पद्धतीमुळे मतदारसंघात वजन आहे. एरवी काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लीम समाजाच्या मतांचे 'एएमआयएमआय' चे नेते आ. अकबरोद्दीन ओवेसी यांच्या सभेमुळे विभाजन होईल की, हे मतदार काँग्रेसचाच हात पुन्हा बळकट करतील, यावर मतदारसंघातील काँग्रेसचे यश बरेच काही अवलंबून आहे. आघाडीचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादीनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. 
यामुळे ऐनवेळी कोण उमेदवार असणार, याचीही अधिक उत्सुकता आहे. प्रचार काळात घडणार्‍या घटना, वातावरण निर्मिती आणि जनतेचा कौल यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. शहर मध्य राजकीय 
हालचाली 
बोलविता धनी कोण? 
■ माजी महापौर आरिफ शेख यांचे बंधू तौफिक शेख हे 'एआयएमआयएम'चा झेंडा घेऊन निवडणुकीसाठी सज्ज आहेत. काँग्रेसशी फारकत घेऊन मतविभागणीसाठीच शेख यांना 'एआयएमआयएम'मार्ग कोणी सुचविला? ही राजकीय खेळी करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा डाव कोणाचा आहे? अशी चर्चा या मतदारसंघात आहे.