शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री, राज्यपालांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST

बार्शी (जि. सोलापूर) : विश्व स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री उद्धव ...

बार्शी (जि. सोलापूर) : विश्व स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो व अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी रणजितसिंह डिसले यांचे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाचे स्वागत आहे, असेही ठाकरे म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही डिसले यांचे अभिनंदन केले. नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसले यांचे कौतुक केले.

खासदार सुप्रिया सुळे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

बार्शीतील अलीपूर रोड भागात राहत असलेले सेवानिवृत्त शिक्षक महादेव डिसले यांचे घर हे कालपासून केंद्रबिंदू झाले आहे. रात्रीपासून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध राज्य व देश पातळीवरील मीडियानेही याची दखल घेतली आहे.